Home » मनोरंजन » PHOTO: दीपिकाची झेब्रा स्टाईल पहिलीत का?

PHOTO: दीपिकाची झेब्रा स्टाईल पहिलीत का?

photo:-दीपिकाची-झेब्रा-स्टाईल-पहिलीत-का?
Deepika Padukone In Zebra Style Photoshoot | PHOTO: दीपिकाची झेब्रा स्टाईल पहिलीत का?

‘आँखो मे तेरी…’ असं गाणं वाजताच कारमधून उचरणारी, समोर जमलेल्या गर्दीला हात उंचवत अभिवादन करणारी शांतिप्रिया तुम्हाला आठवतेय का? अर्थात आठवतच असेल. ही शांतिप्रिया दुसरी तिसरी कोणी नसून, ती आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण.

अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणाही ही देखणी अभिनेत्री.

दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या. मग ती पिकू असो, शांतिप्रिया असो किंवा मग ऐतिहासिक रुपातील राणी पद्मावती आणि मस्तानी असो. प्रत्येक भूमिका ती खऱ्या अर्थानं जगली.

आज करिअरमध्ये यशाच्या या टप्प्यावर असूनही दीपिका तिचा मुळातील स्वभाव काही बदलू शकली नाही हेच तिचं खरं यश आहे.

दीपिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे नवनवे फोटो ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

नुकतेच तिने झेब्रा स्टाईलचे कपडे परिधान करून फोटोशूट केलंय; जे व्हायरल झालं आहे. (all photo : deepikapadukone/ig)

Tags: Bollywood entertainment Deepika Padukone

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.