Mouni Roy : पाहा मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षण!

: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.
आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर मौनीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मौनी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे. यावरून लक्षात येते की दाक्षिणात्य पद्धतीनं सूरज आणि मौनीचा लग्न सोहळा पार पडला.
मौनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, गोल्डन कलरचे दागिने आणि केसांमध्ये गजरा या लूकमध्ये दिसत आहे.
मौनीचा पती सूरज हा सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. (all photo: imouniroy/ig)
Tags: wedding mouni roy
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात