Home » मनोरंजन » 'माझ्या Bra ची साईज..' श्वेता तिवारीने केली 'गंदी बात', गृहमंत्र्यांनी घेतली दखल

'माझ्या Bra ची साईज..' श्वेता तिवारीने केली 'गंदी बात', गृहमंत्र्यांनी घेतली दखल

'माझ्या-bra-ची-साईज.'-श्वेता-तिवारीने-केली-'गंदी-बात',-गृहमंत्र्यांनी-घेतली-दखल

नवी दिल्ली, 27 जानेवारी : पॉप्युलर टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आपल्या लूक्स आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. पण आता श्वेता तिवारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे (Shweta Tiwari Controversial Statement) ती निशाण्यावर आली आहे. तिने आपली ब्रा साइज आणि देवाबद्दल भोपाळमध्ये (Bhopal) एक वादग्रस्त वक्तव्य केलं. बुधावारी श्वेता तिवारी आपल्या आगामी वेब सीरिजच्या (Web Series) घोषणेसाठी भोपाळमध्ये पोहोचली होती. तिथे तिने आपल्या संपूर्ण टीमसह एका प्रेस कॉन्फेरन्समध्ये भाग घेतला होता. इथे मीडियाशी बोलताना तिने मस्करीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘माझ्या ब्राचं माप देवच घेत’ असल्याचं ती म्हणाली. फॅशनशी संबंधित वेब सीरिज ‘शो स्टॉपर’च्या अनाउंसमेंटसाठी श्वेता तिवारी, रोहित रॉयसह टीम भोपाळमध्ये होते. त्याचवेळी स्टेजवर मीडियाशी चर्चा करताना तिने हे विवादित वक्तव्य केलं. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हे वाचा – Mouni Roy Wedding: मौनी रॉय अडकली लग्नाच्याबेडीत! अभिनेत्रीचा वेडिंग LOOK चर्चेत

या संपूर्ण प्रकरणाबाबत मध्य प्रदेश सरकार अॅक्शनमध्ये आली आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलीस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचं वक्तव्य ऐकलं आणि पाहिलं असून हे विधान आक्षेपार्ह असल्याचं गृहमंत्री म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना भोपाळ आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं, की श्वेता तिवारीने हे वक्तव्य कशाच्या आधारे केलं, त्यामागचा हेतू काय होता याबाजूने तपास केला जाईल. 24 तासांच्या आत भोपाळ आयुक्त योग्य ती माहिती घेवून, वस्तूस्थिती तपासून अहवाल देतील आणि त्यानंतर श्वेता तिवारीवरील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असंही गृहमंत्री म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.