Home » मनोरंजन » लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली लारा दत्ता ; स्वत: सांगितले कारण

लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली लारा दत्ता ; स्वत: सांगितले कारण

लग्नानंतर-अभिनय-क्षेत्रापासून-दूर-राहिली-लारा-दत्ता-;-स्वत:-सांगितले-कारण
Lara Dutta Reveals The Reason On Taking Break From Film | लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली लारा दत्ता ; स्वत: सांगितले कारण

लारा दत्ता हिने एकेकाळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, काही काळानंतर ती चित्रपटांपासून दूर राहू लागली. तिने स्वत: या मागचे कारण सांगितले आहे.

Lara Dutta

Lara Dutta  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. पण काही दिवसांपूर्वीच तिनं कमबॅक केला आहे. लारा दत्ता हिने एकेकाळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, काही काळानंतर ती चित्रपटांपासून दूर राहू लागली. तिने स्वत: या मागचे कारण सांगितले आहे.

लारा दत्ता सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगा शिखरवती’ या वेब सीरिजमुळे ती खूप चर्चेत आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली असून यात तिने लग्नानंतर चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण  सांगितले. ती म्हणाली, ‘मी 30 व्या वर्षात असताना मला अशा भूमिका मिळू लागल्या, ज्यात मी एकतर कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी मैत्रीण असायची. या भूमिका मला इंडस्ट्रीत 10 वर्षे काम केल्यानंतर मिळू लागल्या. 

लारा सांगते, तिला कॉमिक चित्रपट करताना जास्त आराम वाटतो. कारण अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये तिला या सर्व भूमिकांपेक्षा जास्त काम करण्याची संधी मिळते. लाराने 2003 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर 2015 पासून तिने ब्रेक घेतला. मात्र, दोन वर्षांपूर्वीच तिने इंडस्ट्रीत पुनरागमन केले.

‘हंड्रेड’, ‘हिकअप्स अँड हुकअप्स’ आणि ‘कौन बनेगी शिखरवती’ यासारख्या वेब सीरिजमध्ये लारा दिसली आहे. त्याआधी ती अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसली होती. 

महत्वाच्या बातम्या

  • Lara Datta: ट्रोल करणाऱ्यांना लारा दत्ताचं सडेतोड उत्तर!
  • Lara Dutta,Salman Khan,Partner : अजूनही सलमान मला मध्यरात्री फोन करतो; लारा दत्तानं सांगितलं गुपित
  • Actress Childhood Photo : ‘या’ क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची ‘एंटरटेन्मेंट क्विन’
  • श्रीदेवीच्या पाठीवर लिहिलंय ‘बोनी’; बोनी कपूरने शेअर केला जुना फोटो, चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

Tags: film Lara Dutta

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.