Home » मनोरंजन » कतरिनाच्या आठवणीत विकीचा अभिनय, व्हिडीओ व्हायरल 

कतरिनाच्या आठवणीत विकीचा अभिनय, व्हिडीओ व्हायरल 

कतरिनाच्या-आठवणीत-विकीचा-अभिनय,-व्हिडीओ-व्हायरल 
Vicky Kaushal Played Blue Theme Song In  car After Seeing Katrina Kaif Holidaying Alone  in Maldives  | कतरिनाच्या आठवणीत विकीचा अभिनय, व्हिडीओ व्हायरल 

विकी कौशल कतरिनाच्या आठवणीत कारमध्ये बसून ब्लू (ब्लू थीम) या गाण्यावर अभिनय करताना दिसला. गाण्याचे बोल कतरिना कैफच्या मालदीवमधील फोटोशी जुळले आहेत. 

 vicky kaushal

Vicky Kaushal : लग्नानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री कतरिना कैफ पती विकी कौशल याला सोडून मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. तर इंदूरमध्ये विकीचे शूटिंग सुरू आहे. यावेळी विकी कतरिनाच्या आठवणीत कारमध्ये बसून ब्लू (ब्लू थीम) या गाण्यावर अभिनय करताना दिसला. गाण्याचे बोल कतरिना कैफच्या मालदीवमधील फोटोशी जुळले आहेत. 

 “सागर रंग वफा का, सागर में क्यूँ है, कभी रुख लहू है, कभी रंग ब्लू है… हे गाणे विकीने गायले आहे. विकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक चाहत्याला हेच वाटत आहे की, विकी कतरिनाला खूप मिस करत आहे. अलीकडेच कतरिना विमानतळावर दिसल्यानंतर सर्वांना वाटले की विकी कौशल याला भेटण्यासाठी ती इंदूरला गेली आहे. परंतु, कतरिनाची फ्लाइट मालदीवमध्ये लँड होताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. आज कतरिना कैफने मालदीवचा तिचा सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

या फोटोमध्ये कतरिना कैफने हिरव्या रंगाचा झेब्रा प्रिंटचा शर्ट घातलेला दिसत आहे आणि त्यामध्ये तिने प्रिंटेड व्हाइट बिकिनी घातली आहे. कतरिना कैफने या फोटोच्या कॅप्शनमध्ये मालदीवला तिचे #happyplace असे वर्णन केले आहे. कतरिना कैफचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन मालदीव आहे. ती अनेकदा तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्टीवर जाते. बीचवर वाळूच्या सावलीत बसलेल्या कतरीनाचा फोटो अतिशय सुंदर आहे.

अलीकडेच विकीने इन्स्टाग्रामवर त्याचे काही सोलो फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विकी नर्मदा नदीच्या काठावर एकटाच बसलेला दिसत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी झाला होता आणि लग्नाच्या दीड महिन्यानंतर हे जोडपे शूटिंगमुळे दूर आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Vicky Kaushal : विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित
  • Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या ‘पावनखिंड’ सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
Tags: Katrina Kaif  vicky kaushal maldives 

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed