Home » मनोरंजन » या फोटोतल्या मुलीला ओळखलं? अक्षयच्या हिट सिनेमात केला होता महत्त्वाचा रोल

या फोटोतल्या मुलीला ओळखलं? अक्षयच्या हिट सिनेमात केला होता महत्त्वाचा रोल

या-फोटोतल्या-मुलीला-ओळखलं?-अक्षयच्या-हिट-सिनेमात-केला-होता-महत्त्वाचा-रोल

मुंबई, 24 जानेवारी: बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपली ओळख निर्माण करतात. या कलाकारांमध्ये बाल कलाकारांचादेखील (Child Artist Hey baby) समावेश होतो. लहान मुलांकडून पाहिजे तशी अॅक्टिंग (Acting) करून घेणं, हे अतिशय कठीण काम समजलं जातं. असं असलं तरी काही बालकलाकारांनी आपल्या निरागस अभिनयामुळं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहेत. या फोटोतल्या मुलीच्या बाबतीत हेच झालं होतं. अक्षयच्या हे बेबी सिनेमात त्या छोटुकल्या बाळानेच प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. काही वर्षांपूर्वी ‘हे बेबी’ (Hey Baby film) या चित्रपटात काम केलेल्या जुआना संघवीचा (Juanna Sanghvi) अशाच कलाकारांमध्ये समावेश होतो. ‘हे बेबी’ हा चित्रपटाचं कथानक एंजल (Real name of Hey baby Angel) नावाच्या लहान बाळाभोवती फिरणारं होतं. त्या लहान बाळाची भुमिका जुआनानं केली होती. त्यावेळी लहान बाळ असणारी जुआना आता किशोरवयात आली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) तिचे काही फोटोज व्हायरल झाल्यानं ती पुन्हा चर्चेत आली आहे. Priayanka Chopra-Nick Jonas आणखी एक गूड न्यूज देण्याच्या तयारीत 2007मध्ये ‘हे बेबी’ हा म्युझिकल कॉमेडी (Musical Comedy) चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विद्या बालन (Vidya Balan) मुख्य तर रितेश देशमुख व फरदीन खान सहकलाकाराच्या भूमिकेत होते. चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या लहान मुलीचा रोल जुआना संघवीनं केला होता. त्यावेळी जुआना फक्त 16 महिन्यांची होती.

आता जुआना मोठी झाली असून ती अतिशय सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिचे आत्ताचे फोटो पाहून ही मुलगी ‘हे बेबी’तील लहानगी एंजल आहे, यावर अनेकांचा विश्वास बसलेला नाही. काही युजर्सनी तिच्या फोटोंवर कमेंट्ही केल्या आहेत. तेव्हाची लहानगी मुलगी आता इतकी मोठी झाली आहे!’ अशी कमेंट एका युजरनं केली आहे.

एंजल उर्फ जुआना संघवी आता 17 वर्षांची झाली आहे. तिच्याकडे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ही तीच गोड मुलगी आहे जिनं आपल्या हसण्यानं (Smile) लाखो लोकांच्या मनात घर केलं होतं. तिच्यातील लहानपणीचा निरागसपणा (Innocence) अजूनही टिकून आहे. यामुळं ती जास्त सुंदर दिसत आहे. हे बेबी चित्रपटामुळं जुआनाला खूप प्रसिद्धी मिळाली होती. हे बेबीनंतर जुआनानं अद्याप कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काम केलेलं नाही. मात्र, तिला आणि अक्षय कुमारला पुन्हा एकत्र पाहण्याची अनेक चाहत्यांची इच्छा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.