अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार; गोव्यात रंगणार विवाहसोहळा

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मौनी रॉय हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्मान केले आहे.
मौनी रॉय हिने आधी टीव्ही जगतात वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्येही वेगेवगेळ्या भूमिका केल्या..
नेहमीच आपल्या पोस्टमुळे चर्चेत असणारी मौनी राय तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे.
अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे वृत्त आहे.
गोव्यात हा विवाहसोहळा रंगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मौनी रॉय 27 जानेवारी 2022 रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनी राय दुबई राहणारा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारशी लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
गोव्यात बीच वर या जोडीचे लग्न होणार आहे. मौनी रॉयच्या या डेस्टिनेशन वेडिंगला तिचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र उपस्थित असणार आहेत.
बॉलिवूडमधील काही मोजके कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (all photo credit: imouniroy/ig)
Tags: Goa wedding mouni roy
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात