Home » मनोरंजन » 'मला थोडा वेळ द्या' विशाल निकमची हात जोडून विनंती, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

'मला थोडा वेळ द्या' विशाल निकमची हात जोडून विनंती, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

'मला-थोडा-वेळ-द्या'-विशाल-निकमची-हात-जोडून-विनंती,-वाचा-काय-आहे-नेमकं-प्रकरण?

मुंबई, 14 जानेवारी-   बिग बॉसचा मराठीचा    (Bigg Boss Marathi Winner)  महाविजेता विशाल निकम   (Vishal Nikam)  सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात विशालनं आपलं सौंदर्यावर   (Saundrya)  प्रेम असल्याचं सांगत एक मोठा खुलासा केला होता. शो संपल्यानंतर आता चाहते विशालच्या सौंदर्याला पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तत्पूर्वी सोशल मीडियावर विशालचं नाव एका अभिनेत्रीशी जोडून हीच सौंदर्या असल्याचं सांगितलं जात होतं. यावर आक्षेप घेत, विशाल निकमने सर्वांनाच एक विनंती केली आहे. पाहूया काय म्हणाला विशाल. गेली काही दिवस सोशल मीडियावर विशाल निकमचं नाव अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत जोडलं जात आहे. त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि अक्षयाच विशालची सौंदर्या तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. खरं तर विशाल आणि अक्षयानं ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं आहे. हा फोटो याच मालिकेतील आहे. या गोष्टीवर आता विशाल निकमने आक्षेप घेतला आहे.

विशाल निकमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं आहे, ‘मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, योग्य वेळ आल्यावर काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वतःहुन ‘सौंदर्या’ चं नाव सांगेन. ती एक सामान्य मुलगी आहे. तिचा अभिनय सृष्टीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जुळवू नका. कारण यामुळे विनाकारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. हे लक्षात घ्या. आणि प्लिज धीर धरा… मला थोडा वेळ द्या’. असं म्हणत विशालनं सर्वांना विनंती केली आहे. (हे वाचा: Bigg Boss Marathi’ फेम स्नेहा वाघला मिळाला नवा प्रोजेक्ट! दिसणार ‘या’ भूमिकेत) सांगलीचा विशाल निकम बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनचा विजेता ठरला. या शोमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. बिग बॉसच्या घरात असताना विशाल निकम आणि सोनाली पाटीलमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. प्रेक्षकांनाही ही जोडी फारच पसंत पडली होती. परंतु अचानकपणे विशाल आणि सोनालीमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी विशालने आपलं फक्त सौंदर्यावर कबुल केलं होतं. त्यामुळे सर्वांनाच सौंदर्या नेमकी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. सौंदर्या हे नाव विशालनं दिलेलं आहे फक्त संवादासाठी तिच्या मनातल्या त्या मुलीचं खरं नाव तो लवकरच सांगेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.