Home » Uncategorized » तुम्हालाही पाहता येणार कतरिना-विकीचा लग्नसमारंभ; जाणून घ्या कसं

तुम्हालाही पाहता येणार कतरिना-विकीचा लग्नसमारंभ; जाणून घ्या कसं

तुम्हालाही-पाहता-येणार-कतरिना-विकीचा-लग्नसमारंभ;-जाणून-घ्या-कसं

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची जोरदार चर्चा आहे. उद्या लग्नगाठ बांधून दोघेही बॉलिवूडचे नवे पॉवर कपल बनतील.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई,8 डिसेंबर-   बॉलिवूड अभिनेता विकी कौशल    (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफच्या    (Katrina Kaif)  लग्नाची जोरदार चर्चा आहे. उद्या लग्नगाठ बांधून दोघेही बॉलिवूडचे नवे पॉवर कपल बनतील. संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमानंतर आज होणार्‍या वधू-वरा हळद लावण्यात येणार आहे. प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु कार्यक्रमाच्या आतून एकही फोटो बाहेर येत नाहीय. यामागे एक मोठं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे टेलिकास्ट ओटीटीवर होईलहोणार असल्याचं समोर आलं आहे. यासाठी मोठा करारही झाला आहे. तुम्हालाही विक्की कौशल आणि कतरिना कैफचं लग्न पाहायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला संगीत, मेहंदी, हळदी, वरात आणि अग्नीफेरे देखील पाहता येणार आहेत. विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना लग्नाची प्रत्येक माहिती OTT वर पाहायला मिळेल. विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करार झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच लग्नाबाबत इतकी गोपनीयता पाळण्यात आली आहे. (हे वाचा:फक्त कतरिना कैफच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींची कमाई आहे आपल्या पतीपेक्षा जास्त ) मिड-डेच्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकीने OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime सोबत त्यांच्या लग्नाच्या टेलिकास्ट अधिकारांसाठी करार केला आहे. या करारमधून विकी आणि कतरिनाने मोठी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार हा करार 80 कोटींमध्ये झाला आहे. या करारामुळेच कतरिना आणि विकीने त्यांच्या पाहुण्यांकडून एनडीएवर स्वाक्षरी घेतली आहे जेणेकरून OTT प्लॅटफॉर्मपूर्वी लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही. (हे वाचा:विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याचं Exclusive फुटेज; समोर आला हॉटेलचा INSIDE VIDEO) रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा व्हिडिओ 2022 मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. यामध्ये त्यांच्या साखरपुड्यापासून राजस्थानमधील लग्नाचे सर्व विधी दाखवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, 2019 मध्ये, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या लग्नासाठी OTT प्लॅटफॉर्मवर एक करार देखील केला होता.विकी आणि कतरिनाच्या लग्नाला 120 पाहुणे येणार आहेत. सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स किल्ले बरवाडामध्ये लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरू आहेत.

  Published by:Aiman Desai

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *