Home » मनोरंजन » गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने…’

गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने…’

गहनाच्या-आरोपांवर-सई-ताम्हणकरनं-दिली-प्रतिक्रिया;-म्हणाली,-‘मला-राजने…’

राज कुंद्राच्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया, म्हणाली, तिला…

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 04:53 PM IST

मुंबई 24 जुलै: राज कुंद्रानं (Raj Kundra) आपल्या हॉटशॉट अ‍ॅपसाठी सई ताम्हणकरला (Sai Tamhankar) विचारलं होतं असा दावा अभिनेत्री गहना वशिष्ट (Gehana Vasisth) हिने केला होता. तिच्या या दाव्यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली. चाहते सोशल मीडियाद्वारे सईला याबाबत सवाल करत होते. अखेर सईनं देखील या प्रकरणावर भाष्य केलं. तिने गहनाचा दावा खोडून काढला आहे. (Raj Kundra Pornography case) तिला याबद्दल काहीच माहित नाही. अन् राजने हॉटशॉटसंबंधी कुठलीही ऑफर तिला दिली नव्हती. असं स्पष्टीकरण सई ताम्हणकरने दिलं आहे.

100 दिवस खोलीत बंद करून तुडवा’; सुनिल पालने उडवली राज कुंद्राची खिल्ली

नेमकं काय म्हणाली होती गहना?

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गहनाने राज पॉर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली, “राज कुंद्राला अटक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. त्यावेळीच मला त्याच्या नवीन ‘बॉलिफेम’ या अ‍ॅप बद्दल समजलं होतं. या अ‍ॅपवर चॅट शो तसंच रिअ‍ॅलिटी शो, फिचर फिल्म, म्युझिकल व्हिडिओंचा समावेश असणार होता. याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. त्यात कोणताही अश्लील किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. असंही गहनानं स्पष्ट केलं. या अ‍ॅपवरील एका चित्रपटासाठी त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तर आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकरला विचारण्यात आलं होतं.” अर्थात तिचा हा दावा सई ताम्हणकरने खोडून काढला. गहानाच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचं सई ताम्हणकरच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपचा सईचा काहीही संबंध नसल्याचं सईनं स्पष्ट केलं आहे.

राज कुंद्राला बसणार ED चा दणका; परदेशातील आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी

यापूर्वी असेच काहीसे खुलासे अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने देखील केले होते. “राज कुंद्रा प्रकरणात सर्वात पहिली जबानी मिच दिली होती. अनेक पत्रकार गेली काही दिवस मला राज कुंद्रा प्रकरणावर काही तरी बोल असं म्हणत होतं. मात्र मार्चमध्ये मी सर्वप्रथम माझा जबाब नोंदवला होता. ज्यावेळी मार्चमध्ये तपासाची नोटीस आली होती. तेव्हा मी ना देश सोडून गेले, ना कुठे गायब झाले, ना भूमिगत झाले.” अशी प्रतिक्रिया तिने एका व्हिडीओद्वारे दिली होती. शिवाय तिने राजवर आर्थिक फसवणूकीचे आरोप देखील केले होते.

Published by: Mandar Gurav

First published: July 24, 2021, 4:10 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *