Home » Uncategorized » 83 Teaser Out: रणवीर सिंहच्या '83' चा टीजर अखेर रिलीज; चित्रपट पाहण्यासाठी..

83 Teaser Out: रणवीर सिंहच्या '83' चा टीजर अखेर रिलीज; चित्रपट पाहण्यासाठी..

83-teaser-out:-रणवीर-सिंहच्या-'83'-चा-टीजर-अखेर-रिलीज;-चित्रपट-पाहण्यासाठी.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंहचा (Ranvir Singh) बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ (83) च्या निर्मात्यांनी आयकॉनिक क्रिकेट ड्रामाचा टीझर (Teaser Released) रिलीज केला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 26 नोव्हेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणवीर सिंहचा    (Ranvir Singh)   बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’  (83)   च्या निर्मात्यांनी आयकॉनिक क्रिकेट ड्रामाचा टीझर    (Teaser Released)   रिलीज केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट येत्या 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. टीझर एका क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु होतो आणि क्रिकेट सामना एका मोठ्या वळणावर जातो.असं यामध्ये दाखवण्यात आलं आहे. टीझर रिलीज होताच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. कबीर खान दिग्दर्शित ’83’ हा या वर्षातील सर्वात प्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट भारताच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषकाच्या विजयाभोवती फिरणारा आहे. चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या शूजमध्ये उतरताना दिसणार आहे. तर चित्रपटात ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, अदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमीची भूमिका साकारताना दिसणार आहे.काही दिवसांपूर्वी दीपिकाचा लूकदेखील व्हायरल झाला होता. दीपिका यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसून आली आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत ’83’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत 3d मध्ये रिलीज होणार आहे.कमल हसनच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि अक्किनेनी नागार्जुनचा अन्नपूर्णा स्टुडिओ रिलायन्स एंटरटेनमेंटशी संलग्न करून चित्रपट अनुक्रमे तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. (हे वाचा:कपिल देव की रणवीर सिंह, ’83’मधील हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत … ) काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये कबीर खान यांनी म्हटलं होतं, ‘रणवीर त्याची प्रत्येक व्यक्तिरेखा जगत असतो. सेटवर मी त्याची मेहनत पाहिली आहे. अनेकदा कट म्हटल्यानंतर तो भावुक व्हायचा. या व्यक्तिरेखेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. आता तुम्हाला कपिल देव आणि रणवीरमधला फरक सिनेमात दिसणार नाही. या भूमिकेसाठी रणवीर सिंहने विशेष मेहनत घेतली आहे. सकाळी 20 मिनिटं फुटबॉल खेळून रणवीर वॉर्मअप करायचा. त्यानंतर स्ट्रेचिंग करायचा.रणवीर जवळपास 12 ते 13 षटकांची गोलंदाजी करायचा. त्यानंतर फलंदाजीही करायचा. यादरम्यान तो जवळपास 200 चेंडू खेळायचा. त्यांनतर ब्रेक घेऊन तो फलंदाजी आणि गोलंदाजीचे स्वतःचे व्हिडीओ पाहायचा आणि त्यातून नोट काढायचा.दररोज कमीत कमी चार तास तरी तो व्यायाम करायचा.40 मिनिटं स्विमिंगला द्यायचा यामुळे त्याच्या अतिरिक्त कॅलरीज कमी व्हायच्या.

  Published by:Aiman Desai

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *