Home » Uncategorized » 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील अभिनेत्याच्या मुलीच्या लग्नाची होतेय चर्चा..

'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील अभिनेत्याच्या मुलीच्या लग्नाची होतेय चर्चा..

'महाराष्ट्राची-हास्य-जत्रा'मधील-अभिनेत्याच्या-मुलीच्या-लग्नाची-होतेय-चर्चा.
 • Home
 • »

 • News
 • »

 • entertainment
 • »

 • ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील अभिनेत्याच्या मुलीच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा PHOTO

विनोदी शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अरुण कदम ( arun kadam daughter wedding) यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर त्यांनी लाडक्या लेकीच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 25 नोव्हेंबर :महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या विनोदी शोमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अरुण कदम ( arun kadam daughter wedding) यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर त्यांनी लाडक्या लेकीच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला. आज गुरुवारी 25 नोव्हेंबरला अगदी साध्या पद्धतीने सुकन्याने लग्नगाठ बांधली. सुकन्या ही सागर पोवळे सोबत विवाहबद्ध झाली आहे. आज एकमेकांच्या गळ्यात हार घालून त्यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नाचे फोटो अरूण कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वाचा : स्वरा भास्कर लवकरच आई होणार ! म्हणते, ‘मी आता जास्त वाट पाहू शकत नाही’ नोंदणी पद्धतीने तिचे हे लग्न पार पडले असल्याने जवळच्याच नातेवाईकांना त्यांनी आमंत्रित केले होते. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने केलेले तिचे हे लग्न चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर देखील या लग्नाची चर्चा रंगली आहे. या जोड्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. मधल्या काळात तिने वडील अरुण कदम यांच्यासोबत टिकटॉक सारखे व्हिडीओज बनवले होते त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. फुल स्टॉप एंटरटेनमेंट येथे सुकन्या ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे. तर सागर पोवळे हा ब्रीविंग कन्सल्टंट, हेड ब्रिवर म्हणून बिअर क्षेत्रात कार्यरत आहे.

  Published by:News18 Trending Desk

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed