Home » Uncategorized » VIDEO :मानसी नाईकला चुलीवर चपाती बनवताना पाहून चाहत्यांकडून कौतुक

VIDEO :मानसी नाईकला चुलीवर चपाती बनवताना पाहून चाहत्यांकडून कौतुक

video-:मानसी-नाईकला-चुलीवर-चपाती-बनवताना-पाहून-चाहत्यांकडून-कौतुक

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik and pradip kharera ) तिच्या इन्स्टावर छानसा स्वयंपाक करतानाचा (mansi naik latest video )व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 25 नोव्हेंबर- मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक  (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती पती प्रदीप खऱेरासोबत इन्स्टा रील, फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच मानसी नाईकने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस सुरू आहे. मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik and pradip kharera ) तिच्या इन्स्टावर छानसा स्वयंपाक करतानाचा (mansi naik latest video )व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही म्हणाल यात विशेष काय आहे. विशेष तर आहेच कारण मानसी नाईक चक्क चुलीवर चपात्या बनवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पिंक रंगाची छान साडी नेसली आहे आणि नेहमी सारकी ती फुल मेकअपमध्ये दिसत आहे. मात्र मानसीचा हा गावकाडचा अंदाज चाहत्यांना मात्र भलताच आवडलेला दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकापेक्षा एक कमेंट करून चाहत्यांनी तिचं कौतुक केले आहे. वाचा: PHOTO : ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा! मानसीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, भूख का रिश्ता सिर्फ़ रोटी से है,चमकती थालियाँभूख नहीं मिटाती. यासोबतच तिनं पुढं म्हटलं आहे की, जेव्हा मी सासरी चुलीवरती रोटी करायला शिकले..अशी कॅप्शन देखील तिनं खाली दिली आहे. यावर एका चाहत्यानं म्हटले आहे की,खूपच छान तुम्हाला कशाचं गर्व अभिमान नाही आहे. तुम्हाला चुलीवरच्या चपात्या बनवतांना खूप आश्चर्य वाटत आहे. आणि आज काल च्या मुलींना तर ते पण करता नाही येत खूप अभिमान आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे की, खूपच छान ताई आजकालच्या जमान्यात चुलीवर जास्त पदार्थ कोणाला जमत पण नाही आणि आपण एवढ्या चांगल्या चुलीवर चपात्या बनवल्या. आज कालच्या मुली तर नकाशे काढतात चपाती बनवता पण येत नाही. म्हणून ऑप्शनला मॅगी बनवतात खरंच खूप छान वाटलं तुम्हाला जेवण बनवताना बघून. वाचा : Bigg Boss 15 च्या घराच जाण्यापूर्वी अभिजित बिचुकलेला थांबवलं ; ‘हे’ आहे कारण काहींनी फनी कमेंट देखील केल्या आहेत. मॅडम जेवण तयार झालं असेल तर येऊ का जेवण करायला..तर आणखी एकाने म्हटलं आहे की,हे तर आमचं घर दिसतंय चूल पण आमची च पण बायको मात्र आमची दिसत नाही..अशा कमेंट करत काहींनी तिच्या लुकचे तर काहींनी तिच्या स्वयंपाकाच्या स्किलचं कौतुक केले आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघेही सोशल मीडियावर विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

    मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *