Home » Uncategorized » 'रंग माझा वेगळा' मालिकेत स्नेहसंमेलनाची लगबग; दीपिका-कार्तिकी उलगडणार दीपाचा….

'रंग माझा वेगळा' मालिकेत स्नेहसंमेलनाची लगबग; दीपिका-कार्तिकी उलगडणार दीपाचा….

'रंग-माझा-वेगळा'-मालिकेत-स्नेहसंमेलनाची-लगबग;-दीपिका-कार्तिकी-उलगडणार-दीपाचा….

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ही मालिका प्रेक्षकांना फार पसंत पडत आहे. समाजातील एका वेगळ्या मानसिकतेवर आधारित ही मालिका सर्वांचं मन जिंकत आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ही मालिका प्रेक्षकांना फार पसंत पडत आहे. समाजातील एका वेगळ्या मानसिकतेवर आधारित ही मालिका सर्वांचं मन जिंकत आहे.

  ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका-कार्तिकीचा निरागस अंदाज सध्या भाव खाऊन जातोय. पडद्यामागेही या दोघींची अखंड धमाल सुरु असते.

  मालिकेत दीपिका आणि कार्तिकीचा अनोखा अंदाज लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघी शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक खास गोष्ट सादर करणार आहेत.

  ही गोष्ट आहे दीपाची आणि तिच्या आयुष्यातील चढउताराची. गोष्टीचं नाव आहे रंग माझा वेगळा. दीपाच्या सावळ्या रंगामुळे तिला नेहमीच हीन वागणुक मिळाली.

  मात्र ज्या सावळ्या रंगाला हिणवलं गेलं त्या रंगाचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे दीपिका आणि कार्तिकीने समर्पकरित्या गोष्टीतून मांडलं आहे.

  दीपाच्या आयुष्यात विठ्ठ्ल-रखुमाईचं स्थानही महत्वाचं आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या गाण्यावर या दोन चिमुरड्यांनी नृत्यही सादर केलं आहे. रंग माझा वेगळा मालिकेच्या पुढील भागांमधून हा खास प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

  दीपिका आणि कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या स्पृहा दळी आणि साईशा भोईर यांनी अतिशय मेहनत घेत हा प्रसंग साकारला आहे. या सीनमधले संवाद आणि ते तितक्याच प्रभावीपणे मांडताना रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमचं कौशल्य पणाला लागलं आहे. हा विशेष रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed