Home » Uncategorized » 'तुमची मुलगी काय करते' याचं उत्तर शोधायला टीव्हीवर येतेय मधुरा वेलणकर

'तुमची मुलगी काय करते' याचं उत्तर शोधायला टीव्हीवर येतेय मधुरा वेलणकर

'तुमची-मुलगी-काय-करते'-याचं-उत्तर-शोधायला-टीव्हीवर-येतेय-मधुरा-वेलणकर

सोनी मराठीवर लवकरच तुमची मुलगी काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि मराठमोळा अभिनेता हरीश दुधाणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    मुंबई, 24 नोव्हेंबर- सोनी मराठीवर लवकरच तुमची मुलगी काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि मराठमोळा अभिनेता हरीश दुधाणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  12 वर्षांनी मधुरा वेलणकर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेचा प्रोमो सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टावर शेअर केला आहे. हा प्रोमो काहीसा थ्रीलींग आहे. हा प्रोमो शेअर करत सोनी मराठीनं म्हटलं आहे की,आई मुलीसाठी जीव देऊ शकते आणि वेळ पडली तर…..नवी मालिका – ‘तुमची मुलगी काय करते?’लवकरच….सोनी मराठी वाहिनीवर. वाचा : चला हवा येऊ द्या: त्या एका स्किटमुळे निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय, काय आहे प्रकरण? या मालिकेची कथा तर आई व मुलीभोबती फिरताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. या मालिकेत इतर कोणते कलाकार दिसणार आहेत , याबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्रेक्षकांना पहिलाच प्रोमो हा चांगलाच पसंतीस उतरील आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोचे कौतुक केले आहे. वाचा : ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये दिसणार नवीन शेवंता, का सोडली अपूर्वाने मालिका? मधुरा वेलणकर (Madhura Welankar-Satam) प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. मधुराने शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजीत साटमशी लग्नगाठ बांधली आहे. या नात्याने प्रदीप वेलणकर व शिवाजी साटम हे दोघे नात्याने व्याही आहेत.मधुरा व अभिजीत यांना युवान नावाचा एक मुलगा आहे. मधुरा वेलणकर सोशल मीडियामध्येही खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवीन फोटो अपलोड करताना दिसते.

    मधुराने अखंड सौभ्याग्यवती, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार, गिलटी, गुमनाम है कोई (नाटक), गोजिरी, जन गण मन, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पाऊलवाट, मातीच्या चुली, मी अमृता बोलतेय, मेड इन चीन, रंगीबेरंगी, सरीवर सरी, हापूस, क्षणो क्षणी आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आत ती मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *