Home » Uncategorized » 'वजनावरून निगेटिव्ह कॉमेंट',अपूर्वानं सांगितलं शेवंता सोडण्याचं धक्कादायक..

'वजनावरून निगेटिव्ह कॉमेंट',अपूर्वानं सांगितलं शेवंता सोडण्याचं धक्कादायक..

'वजनावरून-निगेटिव्ह-कॉमेंट',अपूर्वानं-सांगितलं-शेवंता-सोडण्याचं-धक्कादायक.

शेवंताच्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता मालिकेत दिसणार नाही. अपूर्वाने ही मालिका का सोडली याचा खुलासा तिनं सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 24 नोव्हेंबर- ‘रात्रीस खेळ चाले’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्व पात्रे म्हणजे अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या ही देखील खूपच लोकप्रिय झाली. कोकणातील माणसाची नेमकी नस या मालिकेतून दाखवण्यात आल्याने अनेकांनी ही मालिका आपली वाटू लागली. या मालिकेतील अण्णा नाईकांची शेवंता अख्या महाराष्ट्राची फेवरेट आहे. शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने  साकारली आहे. .’रात्रीस खेळ चाले 3′ (ratris khel chale 3) मधून शेवंता फेम अपूर्वाने पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण आता शेवंताच्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता मालिकेत दिसणार नाही. अपूर्वाने ही मालिका का सोडली याचा खुलासा तिनं सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. अपूर्वा नेमळेकरने तिच्या इन्स्टावर तीन पानी नोट जाहीर केली आहे. यामध्ये तिनं मालिका सोडण्याचं नेमके काय कारण आहे याचा खुलासा केला आहे. अपूर्वा नेमळेकरने म्हटलं आहे की, ” शेवंता बस नाम ही काफी है पर कभी कभी इतना ही काफी नही होता’ आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते त्या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधान वाटले. खरं सांगायचं तर शेवंताचे सादरीकरण हे मला सहज जमत गेले जणूकाही ती शेवंताची चेतना आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य त्या व्यक्तिरेखेत विविध पैलू निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली खूप काही देऊन गेली. वाचा: ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये दिसणार नवीन शेवंता, का सोडली अपूर्वाने मालिका? असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की, असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला. मला माझ्या सोशल मीडियावर कमेंट, ईमेलमधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणं हे माझं कर्तव्य समजून याचा खुलासा मी करत आहे. ती पुढं म्हणते की, शेवंता या भूमिकेसाठी मी दहा किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर त्या काही निगेटिव्ह कॉमेंट आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट तर मला जिव्हारी लागतील असा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल व त्यावर कारवाई केल्यानंतर ही संबंधित नव्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.

  तुम्हाला माहीतच आहे की मालिकेचे शूटिंग सावंतवाडीत सुरू आहे. मी मुंबईवरून बारा तासाचा ट्रेनने प्रवास करून जात होते. मला शूटिंग करता बोलवल्यानंतर फक्त एक दिवस शूट करून नंतर तीन ते चार दिवस काहीच शूट केले जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ सहा ते सात दिवस काम लागत होतं आणि त्याकरता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता. प्रोडक्शन हाऊस कडून मला सांगण्यात आलं होतं की, तिसरा सीजनसाठी तुमचे आम्हाला पाच ते सहा दिवस लागणार आहेत म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनल कडून मला आणखी एक शो देण्याचं आश्वासन देण्यात आले परंतु पाच ते सहा महिने झाले अद्याप ती आश्वासन पाळलं गेलं नाही त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे. वाचा : चला हवा येऊ द्या: त्या एका स्किटमुळे निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय, काय आहे प्रकरण? असाच प्रकार गेल्या वर्षी सुद्धा झी युवा वरील ‘तुझं माझं जमतय’ या मालिकेच्या वेळी देखील घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनलकडून एकही पैसा बुडणार नाही असं आश्वासन दिलं गेलं होतं. अद्याप पर्यंत चेक मिळाला नाही आणि ते सुद्धा आश्वासन पाळले गेले नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनलला एकनिष्ठ राहून काम केलं परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळालाच नाही आणि माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर मला ही मालिका सोडावी लागली. हे दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझ्या वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथे थांबले नाही आणखीन काही नवीन रोज मी करत राहील. आपल्या प्रेमाचा वर्षाव सदैव होत राहील अशी मी आशा करते. हीच माझी एकच प्रेरणा आहे.. अशी पोस्ट अपूर्वा नेमळकरने करून तिच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. चाहत्यांनी देखील तिला पाठींबा दर्शवला आहे.

  Published by:News18 Trending Desk

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *