Home » मनोरंजन » राजसोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; समोरा-समोर होणार चौकशी

राजसोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; समोरा-समोर होणार चौकशी

राजसोबत-क्राईम-ब्रँचची-टीम-पोहोचली-शिल्पाच्या-घरी;-समोरा-समोर-होणार-चौकशी

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 06:04 PM IST

मुंबई, 23 जुलै-  बॉलिवूडसह (Bollywood) सर्वत्रचं सध्या मोठी खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री एक धक्कादायक माहिती समोर आली होती. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. मुंबई पोलिसांकडे राज कुंद्राविरुद्ध सबळ पुरावे आहेत. ज्या व्हाट्सअप चॅटवरून तो दोषी ठरू शकतो ते व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण खुपचं गंभीर बनत चाललं आहे. आत्ता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीतदेखील वाढ होताना दिसत आहे. मुंबई क्राईम ब्रांचची टीम राज कुंद्राला घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचली आहे. आत्ता समोरासमोर बसून त्यांची  चौकशी होऊ शकते.

शुक्रवारी मुंबई कोर्टाने राजच्या पोलीस कोठडीत वाढ करत ती 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. यादरम्यान त्याचा सहकारी रेयोन थोर्पेसुद्धा पोलिस कोठडीत राहणार आहे. राज कुंद्राला भायकळामधून कोर्टात आणण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून राजच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये समोर आलेल्या या प्रकरणात राजसह तब्बल 11 लोकांना अटक करण्यात आलं आहे. आज मुंबई क्राईम ब्रँचची टीम राज कुंद्रासोबत घरी पोहोचली आहे. अर्थातच शिल्पाच्या घरी सध्या ही टीम अत्यावश्यक कागदपत्रे आणि सीडी शोधत आहेत.

(हे वाचा: Captain India:कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेता बनणार पायलट)

अश्लील चित्रफित अर्थातचं पोर्नोग्राफी हा आपल्या देशात खुपचं मोठा गुन्हा समजला जातो. इंटरनेटचा वापर वाढल्यापासून, आपल्या भारत देशात या संबंधी कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. या आरोपामध्ये IT ACT आणि IPC अंतर्गत अनेक वर्षांची शिक्षा तसेच मोठा दंडसुद्धा होऊ शकतो.

(हे वाचा:राज कुंद्रा केसमध्ये शर्लिन चोप्राचा VIDEO व्हायरल; केला धक्कादायक खुलासा   )

राज कुंद्राला अटक होताचं सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. या प्रकरणामध्ये अनेक अभिनेत्री पुढे येऊन आपली बाजू मांडत आहेत. तर अनेकांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला दिवसेंदिवस नवीन वळण लागत आहे.

Published by: Aiman Desai

First published: July 23, 2021, 5:02 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *