Home » मनोरंजन » शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video

शिल्पा शेट्टीच्या घरी पोलिसांचा छापा; पाहा कारवाईचा Exclusive video

शिल्पा-शेट्टीच्या-घरी-पोलिसांचा-छापा;-पाहा-कारवाईचा-exclusive-video

सोबत ते राज कुंद्राला देखील त्याच्या घरी घेऊन आले आहेत. पाहा पोलीस करत असलेल्या या कारवाईचा एक्सूझिव्ह व्हिडीओ

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 05:40 PM IST

मुंबई 23 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. राज विरोधात सतत विविध पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान राजला आणखी एक धक्का देण्यात आला. त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांच्या हाती काय लागलं याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु पोलीस त्याच्या पॉर्नोग्राफी व्यवसायाबद्दल माहिती देणारे काही दस्ताऐवज शोधत आहेत. सोबत ते राज कुंद्राला देखील त्याच्या घरी घेऊन आले आहेत. पाहा पोलीस करत असलेल्या या कारवाईचा एक्सूझिव्ह व्हिडीओ

राज कुंद्रासोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; चौकशी सुरू pic.twitter.com/MpxjadN0fu

— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2021

Raj Kundra नव्या अ‍ॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का

राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.

राज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश

राज कुंद्रासोबत क्राईम ब्रँचची टीम पोहोचली शिल्पाच्या घरी; चौकशी सुरू pic.twitter.com/3FyJkGMZel

— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2021

याशिवाय पोलिस कधीही आपल्या पर्यंत पोहोचू शकतात याची भनक देखील राज कुंद्रा ला होती. त्यामुळे पोलिसांनी ऑफिसवर धाड टाकण्याआधीच जवळपास 2TB डेटा हा डिलीट करण्यात आला होता. क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार अद्याप पोलिसांनी 100 हून अधिक अश्लील चित्रफीती त्यांनी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सुरू असून राज कुंद्राची पोलीस कोठडी आता 29 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Published by: Mandar Gurav

First published: July 23, 2021, 5:18 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *