Home » मनोरंजन » Shilpa Shetty : ‘या’ कारणांसाठी होऊ शकते शिल्पा शेट्टीची चौकशी, महत्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती

Shilpa Shetty : ‘या’ कारणांसाठी होऊ शकते शिल्पा शेट्टीची चौकशी, महत्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती

shilpa-shetty-:-‘या’-कारणांसाठी-होऊ-शकते-शिल्पा-शेट्टीची-चौकशी,-महत्वाची-माहिती-एबीपी-माझाच्या-हाती

मुंबई :  जेव्हापासून मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक केली आहे, तेव्हापासून शिल्पा शेट्टीच्या चौकशीची बाब चर्चेत आहे. तेव्हा तिची चौकशी का होऊ शकते? याचं कारण मुंबई पोलीस सूत्रांकडून एबीपी माझा दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांचने राज कुंद्राची कंपनी वियानचे संचालक आणि कार्यालयीन कामगारांना चौकशीसाठी बोलावले आहे. या कंपनीत शिल्पा शेट्टी यांचेही महत्त्वाचे पद होते असा पोलिसांचा संशय आहे. पण 2020 मध्ये शिल्पाने ते पद सोडले. शिल्पा शेट्टीने या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या कंपनीच पद का सोडलं या बद्दल मुंबई पोलिसांना तपास करायचा आहे. 

 Raj Kundra : ‘डर्टी पिक्चर’चा तुरुंगात ‘दी एन्ड’? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले की आम्ही कंपनीच्या आयटी आणि वित्त विभागाच्या लोकांना समन्स बजावले असून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.शिल्पा शेट्टीदेखील एका महत्त्वपूर्ण पदावर होत्या परंतु 2020 मध्ये जेव्हा महाराष्ट्र सायबरने अशाच एका अश्लील व्हिडिओ प्रकरणात एफआयआर दाखल केली तेव्हा त्यांनी या पदावरुन राजीनामा दिला. 

Raj Kundra Case : पॉर्न फिल्म रॅकेटचं सावज ठरलेली मॉडेल ‘माझा’वर, म्हणते… 

शिल्पा शेट्टी सोबतच अलीकडे कोणत्या लोकांनी कंपनीचे स्थान सोडले आहे याचा आम्ही तपास करीत आहोत. गरज भासल्यास या संदर्भात स्पष्टीकरण मिळण्यासाठी शिल्पा शेट्टी यांनाही बोलावले जाऊ शकते, अशी माहिती क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शिल्पा शेट्टी या वियान व्यतिरिक्त राज कुंद्राच्या जेएल स्ट्रीमची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. नुकतीच पोलिसांना जेएल स्ट्रीमच्या ऑफिसवर छापे टाकले. तिथून बरीच कागदपत्रेही सापडली आहेत.

कुंद्राने 2 टीबी डेटा हटवला?

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुंद्राच्या अंधेरी कार्यालयात छापा टाकला आणि बरीच माहिती जप्त केली, या व्यतिरिक्त गुन्हे शाखेलाही त्यातून बराच डेटा हटवल्याचा संशय आहे.

स्टोरेज एरिया नेटवर्क मधून बरेच डेटा गहाळ झाले आहेत असा संशय पोलिसांना आहे. कुंद्राच्या कंपनीचे आयटी हेड रायन थॉर्पे यांनी पोलिसांना सांगितले की सर्व व्हिडीओ लंडनमधील केनरिन कंपनीला पाठविला गेले. जे कुंद्राच्या कार्यालयातूनच पाठविले गेले, जेणेकरून ते हॉटशॉटवर अपलोड केले जाऊ शकेल.

कुंद्रा पोलिसांच्या तपासात सहकार्य करीत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आणि ते म्हणाले की सर्व काही लंडनची कंपनी चालवणारे त्यांचे मेव्हणे प्रदीप बक्षी यांनी केले होते. पोलिसांकडून मिळालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटसंदर्भात कुंद्राने सांगितले की, तो फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत असे, परंतु काहीही केले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *