Home » मनोरंजन » BRAKING: राज कुंद्राला कोर्टाचा फटका; 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी कायम

BRAKING: राज कुंद्राला कोर्टाचा फटका; 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी कायम

braking:-राज-कुंद्राला-कोर्टाचा-फटका;-27-जुलैपर्यंत-पोलीस-कोठडी-कायम

राज कुंद्राच्या (Raj Kundra) बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 02:30 PM IST

मुंबई, 23 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि निर्माता राज कुंद्रा (Raj Kundra in Court) याला अश्लील फिल्मच्या (Adult content) निर्मितीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या (Raj Kundra) बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयान थोर्पे दोघांनाही आणखी काही दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागेल. 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान राज कुंद्रा प्रकरणी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. राज कुंद्रा अश्लील कंटेट आणि पोर्नोग्राफीची निर्मिती करायचा आणि ते वितरित करण्यासाठी दररोज whatsapp ग्रूप तयार करायचा अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

या प्रकरणामध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडे आणि शर्लीन चोप्रा खुलेपणाने बोलत आहेत. नुकताच शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) आपला एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. त्यामध्ये तिने खळबळजनक खुलासे केले आहेत.

राज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश

शर्लिन चोप्राने काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. शर्लिनने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे, ‘राज कुंद्रा प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर सेलच्या टीमला सर्वात प्रथम जबाब देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती मी होते’. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

First published: July 23, 2021, 2:24 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *