Home » मनोरंजन » Video: देवी सिंगचे सर्व प्लॅन फसले; चंदामुळे ‘Devmanus’ जाणार तुरुंगात

Video: देवी सिंगचे सर्व प्लॅन फसले; चंदामुळे ‘Devmanus’ जाणार तुरुंगात

video:-देवी-सिंगचे-सर्व-प्लॅन-फसले;-चंदामुळे-‘devmanus’-जाणार-तुरुंगात

देवी सिंग आणि डिम्पल जाणार तुरुंगात; चंदाच्या एण्ट्रीमुळे मालिकेत आला नवा ट्विस्ट

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 23, 2021 11:32 AM IST

मुंबई 23 जुलै: देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (Devmanus TV Serial) दरम्यान या मालिकेत आता आणखी एक नवं वळण आलं आहे. यामध्ये चंदी (Chandi) नामक एका तरुणीची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे आल्याआल्याच तिने खलनायक देवी सिंगला आव्हान दिलं आहे. ती देवी सिंगचे सर्व योजना हानून पाडताना दिसते. आता तिच्या मदतीने पोलीस देवी सिंगला बेड्या ठोकतील का?

झी वाहिनीने मालिकेचा एक प्रोमो रिलिज केला आहे. यामध्ये देवी सिंग डिंम्पलला चंदावर नजर ठेवायला सांगतो. तिच्याकडे असलेले पुरावे शोधायला सांगतो. परंतु चंदा देखील त्याचा प्लान हानून पाडते. नजर ठेवणाऱ्या डिम्पलला उलट तिच पकडते. तिच्या या कृतीमुळे खलनायक आता आणखीनच घाबरला आहे. या पार्श्वभूमीवर चंदाच्या मदतीने पोलीस देवी सिंगला पकडतील का? अशी उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Published by: Mandar Gurav

First published: July 23, 2021, 11:20 AM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *