Home » Uncategorized » आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला

आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला

आर्यन-खानला-मोठा-झटका,-पुन्हा-जामीन-फेटाळल्याने-तुरुंगातील-मुक्काम-वाढला

आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई, 20 ऑक्टोबर : आर्यन खानला (Aryan Khan) मोठा झटका बसला आहे कारण पुन्हा एकदा त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला (Mumbai Special NDPS Court rejects bail application of Aryan Khan) आहे. जामीन फेटाळल्यामुळे आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Cruise Drug Party bust) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) या दोघांचाही जामीन फेटाळला आहे.

Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB

— ANI (@ANI) October 20, 2021

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. यापूर्वीही म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी सुद्धा आर्यन खान याचा जामीन आर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या जामीन अर्जावर सुनावणी नंतर न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला आहे. आर्यन खानच्या जामीन याचिवेर सुनावणीदरम्यान एनसीबीने कोर्टाला सांगितलं की, त्यांच्याजवळ असे पुरावे आहेत ज्यावरुन असं कळतं की, आर्यन बऱ्याच वर्षांपासून प्रतिबंधित ड्रग्सचं सेवन करीत होता. इतकच नाही तर त्याने दुसऱ्या देशांमध्ये जाऊनही नशा केला आहे. असा आहे घटनाक्रम  2 ऑक्टोबरला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक 3 ऑक्टोबर रोजी एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली 4 ऑक्टोबर – पुन्हा 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा निर्णय आला. 7 ऑक्टोबर – पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 10 ऑक्टोबर – नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले 14 ऑक्टोबर – न्यायालयाने निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला 20 ऑक्टोबर – न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला एनसीबी विरोधात शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. आर्यन खान अटक प्रकरणात आता शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या विरोधात आणि आर्यन खानच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेतली आहे. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी आर्यन खानच्या समर्थनार्थ ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देण्यात आला आहे. याप्रकरणी स्यू मोटो दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना लक्ष करुन कारवाई करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीशांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.