Home » Uncategorized » 'अधीर मन..' वीणा जगतापने सांगितली मनाची अवस्था;तर युजर्सनी विचारलं शिव ठाकरेबाबत

'अधीर मन..' वीणा जगतापने सांगितली मनाची अवस्था;तर युजर्सनी विचारलं शिव ठाकरेबाबत

'अधीर-मन.'-वीणा-जगतापने-सांगितली-मनाची-अवस्था;तर-युजर्सनी-विचारलं-शिव-ठाकरेबाबत
 • Home
 • »

 • News
 • »

 • entertainment
 • »

 • ‘अधीर मन..’ वीणा जगतापने सांगितली मनाची अवस्था;तर युजर्सनी विचारलं शिव ठाकरेबाबत प्रश्न

‘बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi 2) फेम अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap) नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 18ऑक्टोबर- ‘बिग बॉस मराठी‘(Bigg Boss Marathi 2) फेम अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap) नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. आणि व्हिडीओला भरभरून लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा देत आहेत.

  वीणा जगतापने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर रील शेअर केला आहे. यामध्ये वीणा पारंपरिक नऊवारी साडीमध्ये दिसून येत आहे. वीणाने मराठीतील सुंदर ‘अधीर मन’ या गाण्यावर हा रील बनवला आहे. वीणाच्या नखरेल अदा पाहून चाहते तिच्यावर जाम फिदा होत आहेत. व्हिडीओमध्ये वीणाने पारंपरिक साडीसह पारंपरिक दागिनेही घातले आहेत. शिवाय पायात पैंजण आणि नाकात नथही आहे. तसेच केसांचा अंबाडाही बांधला आहे. वीणाचा हा साजशृंगार पाहून अनेकांना ‘छबीदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार…’ हे गाणंच आठवत आहे. वीणा जगताप मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या पर्वात तिची स्पर्धक आणि विजेता शिव ठाकरेसोबत जवळीकता निर्माण झाली होती. या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये खुलणारं प्रेम अनेकांनी पाहिलं होतं. ही जोडी प्रचंड पसंत करण्यात आली होती. इतकंच नव्ह तर वीणाने शिवसाठी टॅटूही बनवून घेतलं होतं. घरातून बाहेर आल्यानंतर हे दोघेही सतत एकत्र पाहण्यात येत असत. तसेच हे दोघे एकमेकांच्या कुटुंबासोबतही वेळ घालवताना दिसून येत होते. मात्र काही दिवसांपासून या दोघांमध्ये अंतर आल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना बरीच दिवस झाले एकत्र पाहण्यात आलेलं नाहीय. त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चेला अजून गांभीर्य प्राप्त झालं आहे, जेव्हा चाहत्यांना वीणाच्या हातावरील टॅटू गायब झालेला दिसला. नुकताच एका व्हिडीओमध्ये वीणाच्या हातावरचा टॅटूचं नसलेला दिसून आला. त्यामुळे हे दोघेही विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे. (हे वाचा:वीणाने हटवला शिवच्या नावाचा टॅटू ; खरंच दोघांचा झालाय का BREAK-UP … ) वीणा जगतापने २०१८मध्ये आलेल्या ‘व्हॉट्सऍप लग्न’ या मराठी चित्रपटातून अभिनयसृष्टीत पदार्पण केलं होतं. या नंतर ती बिग बॉसमराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली. आणि या शोमुळेच तिला खरी ओळख मिळाली होती. त्यांनतर वीणा जगताप छोट्या पदड्यावरील मराठी मालिका ‘आई माझी काळूबाई’ यामध्ये दिसली होती. मात्र काही काळानंतर तिने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

  Published by:Aiman Desai

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *