Home » Uncategorized » नेहा पेंडसेने नवऱ्याला सर्वांसमोर केले किस अन् VIDEO झाला व्हायरल

नेहा पेंडसेने नवऱ्याला सर्वांसमोर केले किस अन् VIDEO झाला व्हायरल

नेहा-पेंडसेने-नवऱ्याला-सर्वांसमोर-केले-किस-अन्-video-झाला-व्हायरल

अभिनेत्री नेहा पेंडसेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत ती नवऱ्याला रेस्टॉरंटमध्ये खुल्लमखुल्ला किस करताना दिसते आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 13ऑक्टोबर: मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे (neha pendse ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या ती भाभीजी घर पर है या मालिकेत काम करते आहे. ती या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत ती तिचा नवरा शार्दुल सिंग ब्याससोबत रोमान्स करताना दिसते आहे. यावेळी नेहाने सर्वांसमोरच नवऱ्याला किस (kiss) केले आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत ती नवऱ्याला रेस्टॉरंटमध्ये खुल्लमखुल्ला किस करताना दिसते आहे. या व्हिडिओत दोघेही रोमँटिक अंदाजात दिसते आहे.

  नेहाने हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर करत म्हटले आहे की, WAKAI is now open…तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. कमेंटमध्ये एका नेटकऱ्याने विचारले आहे की, तुझे लग्न कधी झाले? तर काही युजर्संनी तर विभूती भैय्याकडे तक्रार करेल अशी कमेंट केली आहे. अशा एकापेक्षा एक कमेंट तिच्या या व्हिडिओला येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा : Malaika Arora च्या सिझलिंग फोटोवर चाहते फिदा; अर्जुन म्हणतो, ‘वीकेंड प्लॅन काय आहे?’ नेहा नुकतीच सोनाली खरेच्या खरे बोल या कार्यक्रमात दिसली होती. नेहाने यावेळी तिचा फिटनेस फंडा काय आहे याबद्दल सोनालीसोबत गप्पा मारल्या. नेहा तिच्या फिटनेसाठी देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.नेहाच्या कामाविषयी सांगयचे तर ती शेवटची जून चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आगामी चित्रपट रावसाहेबची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती नेहाने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सध्या ती भाभीजी घर पर है या हिंदी मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

  Published by:News18 Trending Desk

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *