Home » Uncategorized » स्वतः फालतू शोमध्ये जाते ; Bigg Boss सहभागावरून शिवलीला पाटील अजूनही होतेय ट्रोल

स्वतः फालतू शोमध्ये जाते ; Bigg Boss सहभागावरून शिवलीला पाटील अजूनही होतेय ट्रोल

स्वतः-फालतू-शोमध्ये-जाते-;-bigg-boss-सहभागावरून-शिवलीला-पाटील-अजूनही-होतेय-ट्रोल

कीर्तनकार शिवलीला पाटील (Shivlila Patil Trolled On Social Media) यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाय ठेवल्यापासूनच्या दिवसांपासून ते आजपर्यंत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 23 सप्टेंबर: कर्लस मराठीवर ‘बिग बॉस’ मराठीचातीसरा सीजन  (Bigg Boss Marathi 3)  अगदी धुमधडाक्यात सुरू झाला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कलाकार मंडळीसह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. यावेळी स्पर्धक म्हणून किर्तनकार शिवलीला पाटील यांनी हजेरी लावली आहे. शिवलीला पाटील  (Shivlila Patil Trolled On Social Media) यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाय ठेवल्यापासूनच्या दिवसांपासून ते आजपर्यंत त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तुम्हाला अशा शोमध्ये येणे शोभत नाही तर एका नेटकऱ्याने वयस्कर बायांना मालिका बघता म्हणून नाव ठेवते आणि तू स्वतः फालतू शो मध्ये जाते मग तुला लाज वाटत नाही का.. असा सवाल करत शिवलीला पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. शिवलीला पाटील यांचा बिग बॉसच्या घरातीसल एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये शिवलीला पाटील या रडताना दिसते आहे. शिवलीला तिच्या मनातील सर्व विचार दुसरी स्पर्धक असलेल्या मीनल शहा हिच्याकडे बोलूण दाखवले आहेत. हे सांगताना मीनल तिला सांगते, ‘तू अजिबात काळजी करू नकोस. तू खूप चांगली खेळत आहेस. भले आपल्या दोघींचे फारसे बोलणे होत नाही. पण तरीसुद्धा तू जे काही खेळत आहे ते कौतुकास्पद आहे. तुला कधीही माझी मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. हे लक्षात ठेव.’ मीनलाच्या या आश्वासक बोलण्याने शिवलीला भावूक होते आणि तिला मिठी मारून रडू लागते. त्याचवेळी विशाल तिथून जात असताना शिवलीलाला विचारतो,’माऊली, काय झालं तुम्ही का रडताय. तुम्ही काहीही काळजी करून नका. टेन्शन न घेता खेळा, असे म्हणतो. यावरून नेटकऱ्यांनी शीवलील पाटीलवर निशाणा साधला आहे व ट्रोल करायला सुरूवात केले आहे.

  नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, झाले नखरे सुरु तर एकाने म्हटले आहे की, जितकी इज्जत कमवली, तेवढी गमवून येणार तर दुसऱ्याने म्हटले आहे अजून इज्जत काढणे बाकी आहे ..आणखी एक नेटकरी म्हणाला आहे, ‘ताई चुकीचं आहे हे तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे.’ वाचा : Star Pravah वर तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्री परतणार ; ‘या’ मालिकेत साकारणार नकारात्मक भूमिका दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होती पण स्वतः मात्र कोरडी पाषाण निघाली. तर तिसरा नेटकरी म्हणतो,  वयस्कर बायकांना मालिका बघता म्हणून नाव ठेवत होती आणि स्वतः फालतू शो मध्ये जाते, अशा शब्दात नेटकऱ्यांनी किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  शोमध्ये सहभागी झाल्यापासून शिवलीला पाटीलचे ट्रोलिंग सुरूच आहे. याचा तिच्या खेळावर काय परिणाम होणार का, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

  शिवलीला यांच्या वडिलांच्या नाव बाळासाहेब पाटील आहे व ते देखील कीर्तनकार आहेत. बालपणापासून तिला किर्तनाची आवड आहे.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचे गाव आहे.

  Published by:News18 Trending Desk

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *