Home » Uncategorized » Rashmi Rocket Teaser: Taapsee Pannu ने शेअर केला ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटाचा टीझर, अॅथलेटिक्सच्या भूमिकेत दिसेल तापसी

Rashmi Rocket Teaser: Taapsee Pannu ने शेअर केला ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटाचा टीझर, अॅथलेटिक्सच्या भूमिकेत दिसेल तापसी

rashmi-rocket-teaser:-taapsee-pannu-ने-शेअर-केला-‘रश्मि-रॉकेट’-चित्रपटाचा-टीझर,-अॅथलेटिक्सच्या-भूमिकेत-दिसेल-तापसी

Rashmi Rocket Teaser: तापसी पन्नू (Tapsee Pannu) या बॉलिवूड अभिनेत्रीने ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. या टीझरच्या माध्यमातून तापसीने चित्रपटाची एक झलक तिच्या चाहत्यांना
दाखवली आहे. 

तापसीने व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर आज सांयकाळी 6:30 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. तिने टीझर शेअर करत लिहिले आहे की, ‘रश्मि रॉकेटच्या गतीने आज सांयकाळी 6:30 वाजता टीझर येणार आहे. तापसीचा हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

तापसीने शेअर केले होते चित्रपटाचे पोस्टर 

याआधी तापसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख देखील जाहीर केली होती. तिने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तापसीने चित्रपटातील इतर कलाकारांची झलक देखील दिली होती. तिने पोस्टर शेअर करत लिहिले होते, “आता शर्यत सुरू झालेली आहे आणि ती आता दसऱ्यालाच थांबेल. रश्मिला या वर्षात खूप काही नष्ट करायचे आहे. तुम्ही देखील रश्मिसोबत या शर्यतीत सामिल व्हा. ” शर्यतीत तुम्हाला रश्मिची गरज भासेल. रश्मि रॉकेट येत्या 15 ऑक्टोवरला झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटांमध्येदेखील दिसून येईल तापसी 

‘रश्मी रॉकेट’मध्ये तापसी पन्नू अॅथलेटिक्सच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्यासाठी तिला अथक परिश्रम घ्यावे लागले होते. त्या व्यतिरिक्त तापसी पन्नू ही भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजवर बनत असलेल्या शाबाश मिट्ठू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती ब्लर आणि लूप लपेटासारख्या चित्रपटांचादेखील भाग असणार आहे. याआधी ती हसीना दिलरूबा या चित्रपटातून दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *