Saturday, July 24, 2021
Homeमनोरंजनधक्कादायक! T-Seriesच्या भुषण कुमारावर 30 वर्षीय तरुणीच्या बलात्काराचा गंभीर आरोप

धक्कादायक! T-Seriesच्या भुषण कुमारावर 30 वर्षीय तरुणीच्या बलात्काराचा गंभीर आरोप

टी सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर वर बलात्काराचा आरोप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 12:27 PM IST

मुंबई, 16 जुलै-  टी सिरीजचे (T- Series) मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (Bhushan Kumar) वर बलात्काराचा आरोप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका 30 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप (Rape Case) त्यांच्यावर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी सिरीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर बलात्कारसारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(हे वाचा:’बालिका वधू’ फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री याचं दुखद निधन)

भूषणवर आरोप लावण्यात आला आहे, की त्याने टी सिरीजच्या एका प्रोजेक्टमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. पिडीत तरुणीने भूषण कुमारविरोधात तक्रार दाखल केली आहे. काम देण्याच्या आमिषाने सन 2017 ते 2020 पर्यंत तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

(हे वाचा:एक वर्षसुद्धा नाही टिकलं पहिलं लग्नं; खुपचं बेचव होतं लग्नाचं कारण : नीना गुप्ता  )

पिडीत तरुणीने आरोप केला आहे, की तीन वेगवगेळ्या ठिकाणी तिच्यावर अत्यचार करण्यात आला आहे. तसेच पिडीत तरुणीने आरोप करत असं देखील म्हटलं अये, की आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली होती. मुंबईमधील अंधेरी येथील डीएन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published by: Aiman Desai

First published: July 16, 2021, 11:17 AM IST

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments