Saturday, July 24, 2021
Homeमनोरंजनआथिया-KL राहुलच्या नात्याला सुनील शेट्टींची मंजुरी? त्या वक्तव्याने...

आथिया-KL राहुलच्या नात्याला सुनील शेट्टींची मंजुरी? त्या वक्तव्याने…

आथिया आणि राहुल सध्या लंडनमध्ये (London) आहेत. तर एकमेकांसोबत फोटो ही शेअर करत आहेत. यावरच सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 01:33 PM IST

मुंबई 16 जुलै : अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathia Shetty) आणि क्रिकेटर के. एल. राहुल (K. L. Rahul)  यांच्या अफेयरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. अनेकदा ते एकत्र दिसतात तर फोटोही शेअर करतात. तर आता अभिनेते सुनील शेट्टी नी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आथिया आणि राहुल सध्या लंडनमध्ये (London) आहेत. तर एकमेकांसोबत फोटो ही शेअर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते एकत्र आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.

तर काही वृत्तानुसार के एल राहुलने इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल साठी जाताना आथिया ला पार्टनर म्हणून लिस्ट मध्ये नाव लिहिलं होतं. मागील महिन्यात ते लंडनला गेले होते.

अभिनेते सुनील शेट्टी यांनी नुकतीच बॉम्बे टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल आहे की, हो ती लंडन मध्ये आहे. पण तिचा भाऊ अहान सोबत ती तिकडे आहे. ते भाऊ बहीण तिकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत. शेट्टी म्हणाले.

पुढे आथिया आणि राहुल यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मला वाटतं तुम्ही हे त्यांच्याशीच बोललात तर बरं होईल. जाहिराती बद्दल बोलायचं झालं तर हा एक इंटरनॅशनल ब्रँड आहे. आणि त्यांनी या दोघांना घेणं पसंत केलं. मला वाटतं ते एकत्र फार चांगले दिसतात. ते एक चांगली जोडी आहेत ना? म्हणजे हे सगळं ब्रँड च्या दृष्टिकोनातून. आणि मला हे म्हणावं लागेल की ते एकत्र सुंदर दिसतात , जाहिरातीमध्ये.”

Published by: News Digital

First published: July 16, 2021, 1:11 PM IST

Maharashtra Maza News Deskhttps://maharashtramazanews.com
सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments