Home » Uncategorized » 'Bigg Boss मराठी' सीजन 3 मध्ये हे प्रसिद्ध कलाकार असणार स्पर्धक ?

'Bigg Boss मराठी' सीजन 3 मध्ये हे प्रसिद्ध कलाकार असणार स्पर्धक ?

'bigg-boss-मराठी'-सीजन-3-मध्ये-हे-प्रसिद्ध-कलाकार-असणार-स्पर्धक-?

सर्वानांच उत्सुकता लागून राहिलेला रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 3) आपल्या भेटीला येणार आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 15सप्टेंबर- सर्वानांच उत्सुकता लागून राहिलेला रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 3) आपल्या भेटीला येणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून या पर्वाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी कोणते स्पर्धक असणार याबद्दल सगळ्यांच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान काही कलाकरांची नवे प्रामुख्याने समोर आली आहेत. सर्वांचाच लाडका शो ‘बिग बॉस मराठी’ येत्या १९ सप्टेंबरपासून या शोला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तत्पूर्वी अशी चर्चा आहे, कि ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन ३ मध्ये अभिनेत्री गायत्री दातार, संग्राम समेळ,नेहा जोशी, शाल्मली खोलगडे, आनंद इंगळे, चिन्मय उदगीर, पल्लवी सुभाष हि मराठीतील तगडी मंडळी यावेळी शोमध्ये दिसून येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.मात्र याबद्दल अजूनही कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही. (हे वाचा:फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते तापसी पन्नूची बहीण!) तसेच शोला रंजक बनवण्याचं काम करणारे शोचे होस्ट महेश मांजरेकर यावेळी दिसून येणार कि नाही याबद्दल बरीच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र शोचा प्रोमो समोर आल्यानंतर हि हि चिंता दूर झाली होती. त्यामुळे येणाऱ्या नवीन सीझन बद्दल चाहत्यांना जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या १९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता हा शो सुरू केला जाणार आहे. (हे वाचा:या थीमवर आधारित आहे ‘Bigg Boss Marathi’चं नवं घर; नवी अपडेट आली समोर  ) यापूर्वी बिग बॉसचे मराठीचे 2 सीजन खूपच धमाकेदार ठरले होते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे हि विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वात अभिनेता शिव ठाकरे विजेता ठरला होता. या दोघांनाही मोठी पसंती मिळाली होती. या दोन्ही पर्वाच्या धम्माल अनुभवानंतर चाहत्यांना सीजन 3 ची उत्कंठा लागली होती. मात्र सध्या सुरु असणाऱ्या कोरोना परिस्थितीमुळे जलजवळ दोन वर्षे हा शो लांबणीवर पडला होता. चाहते सतत तिसऱ्या पर्व आणण्यासाठी अट्टहास करत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या १९ सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी सीजन ३’ ला सुरुवात होत आहे. (हे वाचा:Hotness Overload! सोज्वळ गायत्री दातारचा बोल्ड अवतार ) तसेच शोचे होस्ट महेश मांजरेकर यांच्या दमदार आवाजाने पुन्हा एकदा बिग बॉसचं घर दणानणार आहे. मद्देश मांजरेकर यांच्या प्रकृतीमुले सर्वांना चिंता लागून होती. यावेळी ते बिग बॉसमध्ये दिसणार कि नाही याबद्दलही चाहत्यांच्या मनात शंका होती. मात्र आत्ता या सर्व शंका दुर झाल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकरांना पाहून चाहते सुखावले आहेत. त्यामुळे हा पर्व आणखीनच धमाकेदार होणार आहे.

  Published by:Aiman Desai

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *