Home » मनोरंजन » लिहिण्यासाठी काहीच नाही म्हणणारे बिग बी का झाले ट्रोल?

लिहिण्यासाठी काहीच नाही म्हणणारे बिग बी का झाले ट्रोल?

लिहिण्यासाठी-काहीच-नाही-म्हणणारे-बिग-बी-का-झाले-ट्रोल?

‘कधीतरी वाढत्या पेट्रोल दरांवर लिहा’; त्या ट्विटमुळे उडवली जातेय बिग बींची खिल्ली

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 17, 2021 02:58 PM IST

मुंबई 17 जुलै: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, ट्विट, व्हिडीओंच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. (Amitabh Bachchan social media post) मात्र यावेळी त्यांना काय नवीन पोस्ट करायचं? असा प्रश्न पडला आहे. अन् या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मदत करावी अशी विनंती त्यांनी आपल्या चाहत्यांना केली. मात्र त्यांची ही विनंती पाहून काही खट्याळ नेटकऱ्यांनी उलट त्यांचीच खिल्ली उडवली आहे. (Amitabh Bachchan trolled) तर मग पाहूया बिग बी असं म्हणाले तरी काय?…

T 3970 – कुछ है नहीं लिखने को !!

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2021

सावळ्या रंगामुळे नव्हतं मिळत काम; वाचा अभिनेत्रीचं न ऐकलेलं सत्य

बिग बी अनेकदा आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कविता पोस्ट करत असतात. मात्र यावेळी त्यांच्याकडे पोस्ट करण्यासारखं काही नाही. त्यामुळे “लिहिण्यासाठी काहीच नाही” अशा आशयाचं ट्विट बिग बींनी केलं. नेहमीप्रमाणेच त्यांचं हे ट्विट देखील काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झालं. दरम्यान काही नेटकऱ्यांनी त्यांना लिहिण्यासाठी नवे विषय सुचवले तर काहींनी त्यांची खिल्ली उडवली.

2013 मे जितने मोदीने पेट्रोल पर ट्विट करने के लिए पैसे दिए थे उससे डबल हम सब भारतीय आपको दे देंगे । सिर्फ हर रोज पेट्रोल के दाम ट्विट कर लो

— एक सुजाण नागरिक (@ShindeAnuraj) July 17, 2021

‘तारक मेहता…’ दिलीप जोशींच्या आधी ‘या’ कलाकरांना मिळाली होती जेठालालची ऑफर

Arreyyy…aise kaise??

— Sr.Bachchan ki MAD Punjan (@1mgupta) July 16, 2021

#PetrolDieselPrice hi likh do

— Tasleem khan (@khantasleem1993) July 16, 2021

“धन्यवाद मोदी जी” आप लिख सकते हों.. क्योंकि आपका अच्छे दिन चल रहा है।

— Shakuntala Sahu MLA (@ShakuntalaSahu0) July 17, 2021

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर येत्या काळात ते ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रम्हास्त्र’, ‘मेडे’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. यापाकी झुंड या चित्रपटाची मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण याचं दिग्दर्शन सैराट फेम नागराज मंजुळे करत आहेत.

Published by: Mandar Gurav

First published: July 17, 2021, 1:01 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.