Home » मनोरंजन » स्वीटूने शेयर केल्या 'टाईमपास' च्या आठवणी; पाहा कशी दिसायची अन्विता

स्वीटूने शेयर केल्या 'टाईमपास' च्या आठवणी; पाहा कशी दिसायची अन्विता

स्वीटूने-शेयर-केल्या-'टाईमपास'-च्या-आठवणी;-पाहा-कशी-दिसायची-अन्विता

अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेयर केला आहे. यामध्ये ती अभिनेत्री केतकी माटेगावकरसोबत दिसून येत आहे

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 17, 2021 03:33 PM IST

मुंबई, 17 जुलै- वेळ कितीही पाठीमागे निघून गेली तरी, आपल्या आठवणी तशाच मनामध्ये कैद राहतात. बऱ्याचवेळा कलाकारसुद्धा सोशल मीडियावर आपले जुने फोटो शेयर करून आपल्या आठवणींना उजाळा देत असतात. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) फेम अभिनेत्री अन्विता फलटणकरने (Anvita Phalatankar) नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा फोटो ‘टाईमपास’ (Timepass) या चित्रपटाच्या सेटवरचा आहे.

अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेयर केला आहे. यामध्ये ती अभिनेत्री केतकी माटेगावकरसोबत दिसून येत आहे. आत्ताच्या मानाने अन्विता यामध्ये खुपचं छोटी दिसत आहे. हा फोटो अनेक वर्षांपाठीमागचा आहे. ‘टाईमपास’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवरचा हा फोटो आहे. अन्वितासोबत या फोटोमध्ये केतकी माटेगावकरसुद्धा दिसून येत आहे. केतकीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेता प्रथमेश परबसुद्धा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अन्विताने ‘चंदा’ ही केतकीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. त्यावर्षी या चित्रपटाने मराठीत सर्वात जास्त कमाई केली होती. अन्विताने शेयर केलेला हा फोटो पाहून सर्वांनाचं ते दिवस पुन्हा एकदा आठवले आहेत.

(हे वाचा: PHOTOS: राहुल-दिशाच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये टीव्ही कलाकारांची हजेरी )

सध्या अन्विता फलटणकर झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. ही मालिकासुद्धा अतिशय लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने टाईमपासच्या चंदाला एक नवी ओळख दिली आहे. मालिकेतील स्वीटू आणि ओमची लव्हस्टोरी सर्वांनाचं खूप आवडते. त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागाची आतुरतेने प्रतीक्षा असते. या मालिकेमुळे अन्विता पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे.

Published by: Aiman Desai

First published: July 17, 2021, 2:24 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.