Home » मनोरंजन » Samantha Prabhu: 'या' व्यक्तीमुळे दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली समंथा प्रभू

Samantha Prabhu: 'या' व्यक्तीमुळे दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली समंथा प्रभू

samantha-prabhu:-'या'-व्यक्तीमुळे-दुसऱ्या-लग्नासाठी-तयार-झाली-समंथा-प्रभू

गेल्या काही दिवसांपूर्वी समंथा अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाल्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समंथा अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाल्याची चर्चा सुरु आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 23 सप्टेंबर-   साऊथमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून समंथा रुथ प्रभूला ओळखलं जातं. या अभिनेत्रीने नुकतंच देशातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे समंथा प्रभू सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी समंथा अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाल्याची चर्चा सुरु आहे. साऊथ सिने इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन 2’ मधून हिंदी प्रेक्षकांवरसुद्धा भुरळ घातली आहे. तसेच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या आयटम सॉन्गमुळे जगभरात तिचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सिने सृष्टीत तिची मागणी प्रचंड वाढली आहे. अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा आलेख भलेही उंचावत असेल पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक अडचणींनी व्यापून गेलं आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपलं तीन वर्षांचं लग्नाचं नातं संपुष्ठात आणत पती नागार्जुनसोबत घटस्फोट घेतला होता. काही महिन्यांपूर्वी समंथा एक्स-पती नागा चैतन्यपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर दोन्ही स्टार्सच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, तेव्हापासून चाहते त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी जोर धरत होते. मात्र दोघांनीही आपण आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, समंथाच्या दुसऱ्या लग्नाच्या वृत्ताने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (हे वाचा:‘या’ साऊथ सुंदरीने फेमस अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टला टाकलं मागे; पाहा List ) अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्री दुसऱ्या लग्नासाठी तयार झाल्याचं सांगितलं जात आहे. तेलगू प्रकाशन सिने जोशने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री समंथा प्रभूला तिचे गुरु असलेले सद्गुरु जगदीश वासुदेव यांनी लग्नासाठी तयार केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्ताला समंथाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीय. यापूर्वी अभिनेता आणि समंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यसुद्धा दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

  Published by:Aiman Desai

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Entertainment, South actress

  Leave a Reply

  Your email address will not be published.