Home » मनोरंजन » शाळेतला ढ विद्यार्थी म्हणून ओळख असणाऱ्या सारंगने कशी सुरु केली जगतभारी भाडिपा कंपनी?

शाळेतला ढ विद्यार्थी म्हणून ओळख असणाऱ्या सारंगने कशी सुरु केली जगतभारी भाडिपा कंपनी?

शाळेतला-ढ-विद्यार्थी-म्हणून-ओळख-असणाऱ्या-सारंगने-कशी-सुरु-केली-जगतभारी-भाडिपा-कंपनी?

मुंबई 10 ऑगस्ट: सध्याचा जमाना हा युट्युब आणि सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडिया influencer ना जिथे सध्या खूप मागणी आहे अशात एका मराठी मुलाने स्वतःच्या हिमतीवर डिजिटल क्षेत्रात उतरत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तो मुलगा म्हणजे जगतभारी सारंग साठ्ये. जगतभारी ही उपाधी त्याला त्याच्या चाहत्यांनी एका स्टॅन्ड-अपनंतर दिली आहे. आज (sarang sathye bhadipa) सारंगचा 40 वा वाढदिवस असून त्याने नेमकी भाडिपा कंपनी स्थापन कशी केली याबद्दल काही धमाल गोष्टी जाणून घेऊया. सारंग हा मूळचा पुण्याचा आहे. त्याचं शिक्षणसुद्धा इथंच झालं असून त्याने त्याच्या 2 को-फाउंडरसह मिळून अशा काळात भाडिपा कंपनीची स्थापना केली जेव्हा युट्युब, डिटीजल प्लॅटफॉर्म याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. सारंगची ओळख ही शाळेत एक ढ विद्यार्थी अशी होती हे तो स्वतःच सांगतो. दिल के करीब या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्याने त्याच्या बालपणाबद्दल आणि भाडिपा सुरु करण्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तो असं सांगतो, “मी शाळेत एक अत्यंत ढ विद्यार्थी होतो. मला स्पेलिंग लिहायचा शब्द लिहायचा प्रॉब्लेम आहे. माझ्या शाळेतल्या बाईंनी मला हे समजून घ्यायला खूप मदत केली. भाडिपासाठी आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागले. माझ्या दोन फाउंडर पॉला आणि अनुषा दोघीही मराठी भाषिक नाहीत. एक तर परदेशी आहे पण दोघींचं म्हणणं होतं की मराठी भाषेत आपल्या भाषेत एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म असावा. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले पण आमच्याकडे पैसे नव्हते. ते उभे करायला आम्हाला खूप वेळ लागला. पहिले काही वर्ष आम्हाला फायनान्स द्यायला कोणी तयार नव्हतं कारण असं काही होऊ शकेल यावर कोणाचा विश्वास नव्हता. हे ही वाचा- Rakshabandhan 2022: मराठीतील ‘या’ आघाडीच्या अभिनेत्रींना नाहीये भाऊ; पण बहिणींची जोडी आहे लई भारी पण आमचेच पैसे टाकून आम्ही पहिला कास्टिंग काऊच नावाच्या सिरीजचा एपिसोड युट्युबवर टाकला आणि बघता बघता केवळ दोन तीन भागांमध्येच आम्ही 30 हजार सब्सक्राइबर कमावले. युट्युब हे असं क्षेत्र आहे जिकडे तुम्ही सुसंगतता ठेवणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट राहून काम नाही केलं तर त्याचा परिणाम नाही होत हे एक मुख्य गमक आहे. मग हळूहळू आम्ही अभ्यास वाढवला. मराठी प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करताना आई-मी ही सिरीज मिळाली. असं हळूहळू एक एक पायरी चढत इथवर आलो आहे.”

भाडिपा सोबत आता सारंग भा2पा आणि विषयकखोल अशी दोन चॅनेल सुद्धा चालवतो. मराठीमध्ये एवढा सॉलिड कन्टेन्ट उभा करणारा भाडिपा हा अगदी मोजक्या मंचापैकी एक आहे.

भाडिपानेच पुन्हा एकदा स्टॅन्डअप कॉमेडीच्या प्रकाराला पुन्हा एकदा नव्या रूपात आणि ते सुद्धा मराठी भाषेत जगासमोर आणलं ज्यातून स्वतः सारंगने जगतभारी अशी ओळख मिळवली. सध्या भाडिपाचे 12 लाखांहून अधिक सब्सक्राइबर आहेत.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.