Home » मनोरंजन » Mukesh Khanna: 'एखादी मुलगी सेक्ससाठी..', मुकेश खन्ना यांचं खळबळजनक वक्तव्य

Mukesh Khanna: 'एखादी मुलगी सेक्ससाठी..', मुकेश खन्ना यांचं खळबळजनक वक्तव्य

mukesh-khanna:-'एखादी-मुलगी-सेक्ससाठी.',-मुकेश-खन्ना-यांचं-खळबळजनक-वक्तव्य

मुंबई, 10 ऑगस्ट-  छोट्या पडद्यावरील ‘शक्तिमान’ या मालिकेमुळे अभिनेते मुकेश खन्ना प्रचंड लोकप्रिय झाले होते. मुकेश खन्ना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. बऱ्याच वेळा त्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. आजही अभिनेत्याने आपल्या अशाच एका वक्तव्याने खळबळ माजवली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मुकेश खन्ना हे सध्या छोट्या पडद्यापासून दूर असले तरी ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते सतत काही ना काही शेअर करुन चर्चेत असतात. शिवाय त्यांचं युट्युब चॅनेलसुद्धा आहे. या युट्युब चॅनेलवर ते सतत विविध विषयांवरील व्हिडीओ शेअर करत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून ते आपलं मत मांडत असतात. मात्र यावेळी त्यांनी मुलींच्या बाबतीत असं काही वक्तव्य केलं आहे की ज्यामुळे नेटकरी त्यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. शिवाय त्यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी खळबळजनक वक्तव्य करत म्हटलंय, ‘जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला सेक्स करण्यासाठी विचारत असेल, तर ती धंदा करत आहे. कारण कोणत्याही सभ्य घरातील मुलगी असं कधीच  करणार नाही’. अभिनेत्याच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

(हे वाचा: Dheeraj Dhoopar: ‘कुंडली भाग्य’ फेम करण बनला बाबा! विनी-धीरज धूपरला पुत्रप्राप्ती) त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहलंय, ‘सॉरी शक्तिमान परंतु यावेळी तुम्ही चूक आहात’. तर काहींनी लिहलंय, ‘रुढीवादी विचार कायमी राहणार’, तर आणखी काहींनी लिहलंय, ‘परंतु मुलांच्या बाबतीत काहीच नाही लिहलं तुम्ही’, तर आणखी एकाने लिहलंय, ‘कूल, आता मुलांच्याबाबतीतसुद्धा लिहा’. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.