Home » मनोरंजन » आघाडीची गायिका लहानपणी दिसायची अशी; क्युट सावनीचा VIDEO VIRAL

आघाडीची गायिका लहानपणी दिसायची अशी; क्युट सावनीचा VIDEO VIRAL

आघाडीची-गायिका-लहानपणी-दिसायची-अशी;-क्युट-सावनीचा-video-viral

मुंबई 09 ऑगस्ट: महाराष्ट्रातील एक आघाडीची गायिका म्हणून ओळख मिळवलेली सावनी रवींद्र सध्या बरीच चर्चेत येताना दिसत आहे. सावनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि ती अनेक नवे अपडेट्स शेअर करत असते. (savaniee ravindra childhood photo) सावनीला शार्वी नावाची गोड मुलगी असून तिचे अनेक फोटो तिने आजवर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या शार्वी नव्हे तर सावनीचा क्युटनेस चाहत्यांना भुरळ पाडताना दिसत आहे. सावनीने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये लहानपणीची सावनी सगळ्यांना पाहायला मिळत आहे. खरंतर तिने हा व्हिडिओ तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला असून त्यामध्ये लहानपणीची गोंडस सावनी दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत ती असं लिहिते, “माझ्या आयुष्यातील खऱ्या वंडर वूमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई तू ग्रेटेस्ट आहेस. लव्ह यु. तळटीप: ही बेबी सावनी आहे शार्वी नव्हे.” हे ही वाचा- Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेचं फॅन फॉलोईंग काही औरच! रसिका-चेतनाला आला प्रेक्षकांचा भन्नाट अनुभव या व्हिडिओमध्ये गबदुल्या गालांची छोटीशी सावनी आईसोबत खेळताना आणि मजा करताना दिसत आहे. आपल्या आवाजासह देखण्या रूपाने सावनी अनेकांना मोहून टाकत असते. सावनीचा गोबऱ्या गालांचा अवतार सुद्धा चाहत्यांना भलताच पसंत पडला आहे. तिचा हा व्हिडिओ बघून अनेकांनी भरभरून रिऍक्शन दिल्या आहेत.

सावनीची मुलगी शार्वी सध्या चाहत्यांची अगदी लाडकी असल्याचं समोर आलं आहे. सावनीही तिच्या मुलीचे अनेक क्युट फोटो शेअर करत असते. सावनीला तिच्या मुलीसोबत राहणं भलतंच आवडतं आणि तिचा चाहतवर्गही कायम आनंदाने त्यांचे हे व्हिडिओ एन्जॉय करत असतो. आता सावनीचा हा नवा व्हिडिओ बघून नेमकं आई मुलींमध्ये कोण जास्त क्युट आहे याबद्दल शंका निर्माण होऊ शकते. सावनीच्या मुलीचा म्हणजे शार्वीच नुकताच वाढदिवस सुद्धा साजरा झाला.

सावनीची मुलगी एक वर्षाची झाली असून त्यानिमित्ताने तिने खास व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “आघाडीची गायिका लहानपणी दिसायची अशी; क्युट सावनीचा VIDEO VIRAL

Leave a Reply

Your email address will not be published.