Home » मनोरंजन » अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर; पाहा व्हिडीओ

अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर; पाहा व्हिडीओ

अंकुश-चौधरी-पुन्हा-थिरकणार-मैनेच्या-तालावर;-पाहा-व्हिडीओ

मुंबई, 8 ऑगस्ट : ‘जत्रा’ चित्रपटातील ‘ये गो ये मैना’ या गाण्यावर कधी न थिरकलेला किंवा हे गाणं  न गायलेला माणूस शोधून सुद्धा  सापडणार नाही. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या गाण्याने वेड लावलं होतं. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अजूनही रसिकांना भुरळ घालतं. या गाण्यातून एक चेहरा लोकप्रिय झाला होता तो म्हणजे आजचा आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी. ‘ये गो ये मैना’ या गाण्यात तो दिसला होता. तेव्हा त्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. आता एवढ्या वर्षांनी परत एकदा अंकुश चौधरी  ‘ये गो ये मैना’ या गाण्यावर डान्स करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अंकुश एका कार्यक्रमादरम्यान या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे. त्याची एक झलक समोर आली आहे. अंकुश चौधरीचा बहुप्रतीक्षित सिनेमा दगडी चाळ 2 हा येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे विविध ठिकाणी प्रमोशन करताना तो दिसतोय. त्याचसाठी तो कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. त्याचाच एक प्रोमो सध्या समोर आला आहे. त्यानुसार  या शो मध्ये एका स्पर्धकाने  ‘ये गो ये मैना’ हे गाणं गायलं आहे. या शोचा  निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्तेने अंकुश चौधरीला या गाण्यावर नाचण्याची विनंती केली आहे. हेही वाचा – Rashmika Mandana : ‘तुमच्यामुळेच मी आज इथे आहे’; रश्मिका मंदानाने मित्रांसाठी लिहिली भावनिक पोस्ट अंकुशने सुद्धा या गाण्यावर ताल धरत मंचावर धमाल आणली आहे. त्याच्यासोबत इतर स्पर्धकांनी सुद्धा ठेका धरला आहे. आता अंकुशला एवढ्या वर्षांनी या गाण्यावर थिरकताना पाहून त्याचे चाहते अगदी खुश झाले आहेत.

अंकुशने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला चाहते भरघोस प्रतिसाद देत आहेत. अंकुशच्या  ‘दगडी चाळ’  या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.  एक सामान्य कुटुंबातील तरूण गुन्हेगारी जगताकडे कसा वळतो यावर हा सिनेमा बेतला होता. आता या सिनेमाचा पुढचा भाग  लवकरच पडद्यावर येणार आहे. दगडी चाळ २ (Dagadi Chaawl 2) या सिनेमाची  प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. अंकुश चौधरी, पूजा सावंत ही जोडी पुन्हा धमाल करणार आहे. मकरंद देशपांडे अरूण गवळीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. नुकतेच या सिनेमातील ‘राघू पिंजऱ्यात आला’ या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यातून बॉलिवूड स्टार डेझी शाह ही मराठीत एंट्री करणार आहे. ‘ये गो ये मैना’ प्रमाणेच हे गाणंही  गाजणार हे नक्की.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.