Home » मनोरंजन » जेव्हा रील लाइफ पुष्‍पा रीअल लाइफ पुष्‍पाला भेटते, वाचा हृदयस्‍पर्शी संवाद

जेव्हा रील लाइफ पुष्‍पा रीअल लाइफ पुष्‍पाला भेटते, वाचा हृदयस्‍पर्शी संवाद

जेव्हा-रील-लाइफ-पुष्‍पा-रीअल-लाइफ-पुष्‍पाला-भेटते,-वाचा-हृदयस्‍पर्शी-संवाद

सोनी सबवर प्रसारित होणारा ‘पुष्पा इम्पॉसिबल’ (Pushpa Impossible) हा शो सध्या चर्चेत आहे. अशातच रील पुष्पा जेव्हा रिअल पुष्पाला भेटते तेव्हा काय घडतं?. पुष्‍पा यांच्‍यामध्‍ये हृदयस्‍पर्शी गप्‍पागोष्‍टी कशा रंगतात हे आपण पाहूया.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 7 ऑगस्ट : सोनी सबवर प्रसारित होणारा ‘पुष्पा इम्पॉसिबल’ (Pushpa Impossible) हा शो सध्या चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री करुणा पांडेनं या मालिकेत पुष्पाची भूमिका साकरली आहे. ‘लोक काय म्‍हणतील याचा आपण विचार करत राहिलो तर लोक काय म्‍हणतील?’ या वाक्‍याला कृतीत आणत सोनी सबची पुष्‍पा (करूणा पांडे) अद्वितीय उत्‍साह व जोशाने तिचे शिक्षण पूर्ण करण्‍याचे स्‍वप्‍न साकारत आहे. अशातच रील पुष्पा जेव्हा रिअल पुष्पाला भेटते तेव्हा काय घडतं?. पुष्‍पा यांच्‍यामध्‍ये हृदयस्‍पर्शी गप्‍पागोष्‍टी कशा रंगतात हे आपण पाहूया. 53 वर्षीय महिला कल्‍पना जांभळे यांना, ज्‍यांनी 37 वर्षांच्‍या अंतरानंतर पुन्‍हा शिक्षण घेण्‍यास सुरूवात केली आणि त्‍या एसएससी बोर्ड परीक्षेमध्‍ये उत्तीर्ण होण्‍यासोबत उत्तम गुणांसह पदवीधर देखील झाल्‍या. रीअल-लाइफ पुष्‍पाला सन्‍मानित करण्‍यासाठी आपल्‍या रील लाइफ पुष्‍पाने मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’च्‍या सेटवर त्‍यांना भेट देण्‍यास आमंत्रित केले आणि हृदयस्‍पर्शी गप्‍पागोष्‍टी केल्या. यांनी पुष्‍पा सारख्‍या लाखो प्रबळ समविचारी महिलांना प्रेरित करण्‍याची आशा व्‍यक्‍त केली. हेही वाचा –  Taapsee Pannu: कॉफी विथ करण कार्यक्रमात न दिसण्याबद्दल बोलली तापसी; ‘माझं सेक्स लाईफ…’ स्‍वत:वरील प्रेमासाठी वयाचे कोणतेच बंधन नाही आणि पुष्‍पा इम्‍पॉसिबल हीच भावना संपूर्ण देशापर्यंत पोहचवण्याचं काम करत आहे. रीअल लाईफ कल्‍पना यांना भेटण्‍याबाबत पुष्‍पाची भूमिका साकारणा-या करूणा पांडे म्‍हणाल्‍या, ”मी स्‍वत: महिला असल्‍यामुळे मला विशिष्‍ट वेळेनंतर स्‍वत:साठी काहीतरी करण्‍याचे ठरवल्‍यानंतर समाजाला काय वाटते हे चांगले माहित आहे. हे अत्‍यंत त्रासदायक व संशयास्‍पद होऊन जातं, जेथे समाज तुमचे वय आणि त्‍यानुसार असणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत टिका करतात. पण मला आनंद होत आहे की, काळ बदलत आहे आणि महिला स्‍वत:हून निर्णय घेण्‍यासोबत त्‍यांच्‍या मध्‍य-वयात जबाबदार बनत आहे. कल्‍पना या अशाच प्रकारच्‍या एक उदाहरण आहेत आणि मला खात्री आहे की, अशा अनेक महिला असतील. दरम्यान, करूणा पांडे व्‍यतिरिक्‍त या मालिकेमध्‍ये नवीन पंडित, दर्शन गुज्‍जर, देश्‍ना दुगड, गरिमा परिहार, भक्‍ती राठोड हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

  Published by:Sayali Zarad

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Entertainment, Social media, Tv serial

  1 thought on “जेव्हा रील लाइफ पुष्‍पा रीअल लाइफ पुष्‍पाला भेटते, वाचा हृदयस्‍पर्शी संवाद

  Leave a Reply

  Your email address will not be published.