Home » मनोरंजन » Vaibhav Tatwawadi: अभिनेता स्क्रिप्ट वाचण्यात झालाय दंग, फोटो शेअर म्हणतोय…

Vaibhav Tatwawadi: अभिनेता स्क्रिप्ट वाचण्यात झालाय दंग, फोटो शेअर म्हणतोय…

vaibhav-tatwawadi:-अभिनेता-स्क्रिप्ट-वाचण्यात-झालाय-दंग,-फोटो-शेअर-म्हणतोय…

मुंबई, 6 ऑगस्ट : हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची दमदार अशी छाप सोडणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi). वैभव नेहमची त्याचा वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालतो. वैभव हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार तर आहेच, पण बॉलिवूडमध्येही तो चांगलाच पसंतीचा चेहरा बनला आहे. अशातच कायम चर्चेत असणारा वैभव आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैभवनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे. वैभव तत्त्ववादीनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पहायला मिळतंय की, वैभवच्या हातात एक स्क्रिप्ट असून तो वाचण्यात दंग झाला आहे. वैभवनं या फोटोला कॅप्शनही भारीच दिलंय. ‘शूटचा पहिला दिवस… माझ्या चेहऱ्यावर सूर्यकिरणं आणि हातात स्क्रिप्ट, एकदम परफेक्ट सुरुवात झाल्यासारखं वाटतंय.’, असं वैभवनं म्हटलं आहे. हेही वाचा –  Sanskruti Balgude ची मित्र-मैत्रिणींसोबत धम्माल, पूलमधील डान्स VIDEO आला समोर वैभवनं हा शेअर केलेला फोटो लंडनमधील असून तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला आहे. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री हृता दुर्गुळेनंही वैभवला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय.

मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा चाहतावर्ग मोठा आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना आपण त्याला पाहिलं आहे. त्याच्या अभिनयानं तो नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असतो. अभिनयाव्यतिरीक्त तो फिटनेस फ्रीकही आहे. तो फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. त्याच्या जबरदस्त पिळदार बॉडिविषयी अनेकजण नेहमीच विचारत असतात. तोही सोशल मीडियावर चाहत्यांना याविषयी सांगतो.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “Vaibhav Tatwawadi: अभिनेता स्क्रिप्ट वाचण्यात झालाय दंग, फोटो शेअर म्हणतोय…

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed