Home » मनोरंजन » ठरलं! रिचा चड्ढा आणि अली फजल 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

ठरलं! रिचा चड्ढा आणि अली फजल 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

ठरलं!-रिचा-चड्ढा-आणि-अली-फजल-'या'-दिवशी-अडकणार-लग्नबंधनात

मुंबई, 5 ऑगस्ट :  रिचा चढ्ढा आणि अली फजल  हे बॉलिवूडमधील लोकप्रिय  जोडप्यांपैकी एक आहेत. ते अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला वेग आला आहे. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. आता  हे दोघेही आपल्या नात्याला नवीन रूप द्यायला सज्ज झाले आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी  पहिल्यांदा  फुक्रे या चित्रपटात एकत्र आलेले काम केलं होतं. तेव्हाच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असं बोललं  जातं. आता अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर  रिचा चढ्ढा आणि अली फजल एप्रिल 2020 मध्येच  लग्नाच्या बेडीत अडकणार होते परंतु कोरोनामुळे झालेल्या लोकडाऊनमुळे त्यांना लग्नाचा प्लॅन पुढे ढकलावा लागला होता. अली फजलने एका मुलाखतीत त्याच्या आणि रिचयच्या लग्नाबाबत सांगताना म्हटले आहे कि, ‘खरंतर  आम्ही दोघेही लग्न करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. येत्या सप्टेंबर महिन्यात महिन्यात लग्न करणार आहोत.’ हेही वाचा – Akshay Kumar : फिटनेस प्रेमी अक्षयने मारला मिसळीवर ताव; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का पुढे तो म्हणाला कि, ‘आम्ही २०२० मध्येच लग्नाची तयारी केली होती. पण कोव्हीडमुळे आम्ही लग्नाची तारीख पुढे ढकलली. आणि जेव्हा सगळं सुरळीत झालं होतं  तेव्हा आम्ही शूटिंगमध्ये बिझी होतो. त्यामुळे वेळ मिळाला नाही. पण आता आम्ही लवकरच लग्नाची तारीख पक्की करू.’

हे जोडपे त्यांच्या फुक्रे  चित्रपटाच्या सेटवर 2013 मध्ये  भेटले होते. अनेक वर्ष डेट करून  डिसेंबर 2019 मध्ये अलीने मालदीवमध्ये सुट्टीवर असताना रिचाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केले होते. रिपोर्टनुसार, अली आणि रिचा या वर्षाच्या शेवटी सप्टेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रिचा आणि अलीच्या  वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, येत्या काळात हे दोघेही ‘फुक्रे 3’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. अली ‘मिर्झापूर 3’ या वेब्सिरिज्मध्ये झळकणार असून   ऋचा संजय लीला भन्साळीच्या आगामी वेब सीरिज ‘हिरामंडी’ मध्ये भूमिका साकारणार आहे. आता या दोघांच्या लग्नाकडे चाहत्यांच्या नजरा टिकून आहेत.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “ठरलं! रिचा चड्ढा आणि अली फजल 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Leave a Reply

Your email address will not be published.