Home » मनोरंजन » 'शिवप्रताप गरुडझेप'चा टिझर प्रदर्शित; अमोल कोल्हे पुन्हा महाराजांच्या भूमिकेत

'शिवप्रताप गरुडझेप'चा टिझर प्रदर्शित; अमोल कोल्हे पुन्हा महाराजांच्या भूमिकेत

'शिवप्रताप-गरुडझेप'चा-टिझर-प्रदर्शित;-अमोल-कोल्हे-पुन्हा-महाराजांच्या-भूमिकेत

मुंबई, 28 जून: छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर, त्यांच्या शूर पराक्रमांवर आधारीत अनेक दर्जेदार मराठी सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ( Digpal Lanjekar) यांच्या शिव अष्टक सिनेमाची सिरीज सध्या सुरू आहे.  त्यानंतर आता मराठी मालिका आणि सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ( Amol Kolhe) हे देखील’शिवप्रताप’ ( Shivpratap) नावाने महाराजांवर आधारीत सिनेमांची सिरीज घेऊन येत आहेत. त्यातील ‘शिवप्रताप गरुडझेप’ ( Shivpratap Garudjhep)  हा पहिला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  सिनेमाचा टिझर (Shivpratap Garudjhep Teaser) नुकताच प्रदर्शित झाला असून सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी अभिनेता डॉ. अमोल कोल्हे या सिनेमाविषयी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना आव्हान दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा काय असायला हवा आणि कसा असतो हे तुम्हाला पाहायला मिळेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.  काय होतं हे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शत शिवअष्टक सिरीजमधील चौथ पुष्प शेर शिवराज है ( Sher Shivraj He) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र सिनेमाचं कौतुक सुरू होतं. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शत दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचा अपमानास्पद उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टवर अमोल कोल्हे यांनी व्हिडीओ शेअर करत राग व्यक्त केला. अमोल कोल्हेंच्या व्हिडीओनंतर शेर शिवराज है सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हात जोडून जाहीर माफी मागितली होती. ‘ही पोस्ट एका चाहत्यानं केली होती आणि अनवधानानं सोशल मीडिया टीमकडून ती पोस्ट केली गेली होती. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. तसंच त्याचा अनादर करण्याची माझी भूमिका कधीच नसेल आणि हे जाणीवपूर्वक केलं नाही. तरीसुद्धा मी त्यांची माफी मागतो’, असं दिग्पाल लांजेकरांनी म्हटलं होतं. हेही वाचा – Mangesh Desai Birthday: ‘तू बिनधास्त कामाला लाग, मी…’ सिनेमा करताना एकनाथ शिंदेंनी मंगेशला दिला होता विश्वास ‘शिवप्रताप गरुडझेप’ या सिनेमाच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.