Home » मनोरंजन » 'कॉलेजमध्ये असताना 31 डिसेंबरला..';'सुंदरा..' फेम अभीच्या आठवणींतला किस्सा

'कॉलेजमध्ये असताना 31 डिसेंबरला..';'सुंदरा..' फेम अभीच्या आठवणींतला किस्सा

'कॉलेजमध्ये-असताना-31-डिसेंबरला';'सुंदरा.'-फेम-अभीच्या-आठवणींतला-किस्सा

मुंबई, 19 जून-  ‘वडील’ हा असा शब्द आहे ज्यात शब्दांपेक्षा भावना जास्त आहेत. बाप म्हणजे कठोरता, प्रेम आणि त्यागाची ती मूर्ती, ज्याची बरोबरी कुणीच करु शकत नाही. बाप हा आपल्या मुलासाठी आदर्श, मित्र, मार्गदर्शक आणि हिरो असतो. जो मुलांच्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात खंबीरपणे पाठीशी उभा असतो. आणि त्यांना लढायला शिकवतो. फादर्स डे  (Father’s Day)  हा वडिलांच्या प्रेमाला समर्पित केलेला खास दिवस आहे.आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’  (Sundara Manamadhe Bharli) फेम मराठमोळा अभिनेता समीर परांजपेने   (Sameer Paranjape)  वडील आणि मुलगा या नात्यावर खास पोस्ट लिहली आहे. कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अभिनेता समीर परांजपे घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत तो अभिमन्यू जहागीरदारची भूमिका साकारत आहे. मालिकेतील अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. याआधी समीरने ‘गोठ’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. शिवाय त्याने हिंदी वेबसीरीजमध्येसुद्धा काम केलं आहे. अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आजही अभिनेत्याने एक खास पोस्ट लिहत सर्वांनाच इमोशनल केलं आहे. समीर परांजपे पोस्ट- ”बाबांना मला काय म्हणायचंय कळतंच नाही नको ते फाटे फोडतात..पासून हिला काय म्हणायचंय ते मला कळणार नाही असं या जगात काहीही नाही पर्यंतचा प्रवास…. सगळ्या गोष्टी बाबांपर्यंत व्हाया आई सांगणारा मी..आता मात्र ही माझाकडे असताना तिने आई-आई केलं की मजेने थोडासा jealous होऊन का ग ए टोचतो का बाप म्हणत हिला तिच्या आई कडे देणारा मी..बाबांच्या गाडीवर बसलो की बाबा किती हळू चालवता हो गाडी द्या मी चालवतो म्हणणारा मी… गाडी सावकाश चालवत जा रे असं अख्ख्या जगाने बोंबलून सांगितलं तरी न ऐकणारा मी, ही गाडीत असली की मात्र ६० च्या वर जात नाही..

पहिली मारामारी झाली तेव्हां आईला सांगू नको रे.. खेळताना पडलो सांग बाकी मी बघतो म्हणणारे तुम्ही आणि हिला पाहिलं vaccine देताना तू जरा बाहेरच थांब मी हिला आत घेऊन जातो असं बायकोला म्हणणारा मी….. कॉलेज मधे असताना न सांगता ३१ डिसेंबर ला नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे पाठवणारे तुम्ही..वर फालतूपणा करून गटारात पडू नका असा मेसेज पाठवणारे तुम्ही.. आणि आता हळूच कोणी आजूबाजूला नाही बघून तुला फ्रीज मधून लपून रोज चॉकलेट देणारा आणि हे शेवटचं हा असा उगाच दम देणारा मी आणि रोज बळजबरी ब्रश करून देणारा ही मी.. (हे वाचा:शाहीर साबळेंचं होतं बाळासाहेबांशी खास नातं, शिवसेना स्थापना दिनी त्यांच्या लेकीने सांगितली ठाकरेकाकांची आठवण ) आई नेहमी म्हणायची बाप होशील तेव्हां कळेल तेव्हा आई cliche डायलॉग मारू नकोस म्हणणारा मी आणि आता बायको ऐक ना तू होलसेल मध्ये गोष्टी आणणं जरा थांबवशील का असं म्हणते तेव्हा गप गं काहीच वर्ष आपल्या कडे असेल ही त्यात कुठे कंजुषी करू हा cliche डायलॉग मारणारा ही मीच…हिला पहिल्यांदा तुमच्या हातात देताना, हळूच हा असं म्हटल्या नंतर “बापाला शिकव” हा तुम्ही दिलेला लूक मनात साठवून ठेवलाय.. मी ही कधीतरी देईन हिला हा लूक..आगाऊपणा करेल तेव्हां..आत्ताशी दीड वर्षाचा झालोय एवढंच मागेन..बाबा तुमच्यातलं 1% बाप पण तरी माझ्यात येवो..”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed