Home » मनोरंजन » बॉलिवूडने झिडकारलं आणि फॅन्सनी सावरलं; 2 वर्षानंतरही सुशांतच्या जाण्याची चाहत्यांना भासते उणीव

बॉलिवूडने झिडकारलं आणि फॅन्सनी सावरलं; 2 वर्षानंतरही सुशांतच्या जाण्याची चाहत्यांना भासते उणीव

बॉलिवूडने-झिडकारलं-आणि-फॅन्सनी-सावरलं;-2-वर्षानंतरही-सुशांतच्या-जाण्याची-चाहत्यांना-भासते-उणीव

मुंबई 13 जून: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (Sushant singh Rajput) आठवण तब्ब्ल दोन वर्षांनी सुद्धा काढली जाते. त्याच्या जाण्याचं दुःख आजही एवढं आहे की यातून कोणीच सावरू शकलं नाहीये. सुशांत जाता जाता आपल्यामागे अनेक अनुत्तरित प्रश्न ठेऊन गेला. त्याच्या जाण्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर टीकेची झोड उठली होती. नेपोटीजम चा शिकार ते अनैसर्गिक मृत्यू अशा अनेक शंका कुशंका त्याच्या मृत्युवर घेतल्या गेल्या होत्या. आज दोन वर्षांनी त्याच्या मृत्यूचा तपास पूर्ण होईल का हे कोणालाच माहित नाहीये पण चाहते सुशांतला आजही तितकंच मिस करतात हे मात्र खरं. सुशांतने दोन वर्षांपूर्वी 14 जून (Sushant Singh Rajput Death Anniversary) रोजी या जागचा अचानक निरोप घेतला. त्याच्या राहत्या घरी तो मृतावस्थेत अढळ होता. सुशांतच्या जाण्याने त्याच्या चाहत्याना जबर धक्का बसला होता ज्यातून आजही कोणीच सावरू शकलं नाहीये. 14 जूनचा तो कला दिवस बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्याला आपल्यासह कायमचा काळाच्या पडद्याआड घेऊन गेला. सुशांत आज देहरूपाने नाही पण त्याच्या आठवणीतून आणि कामातून कायमच आपल्यात जिवंत राहील. जीव ओतून काम करणारा स्टार जिथे बॉलीवूडला आजही नेपोटिझमच्या नावाने शिव्याशाप ऐकावे लागतात त्याच बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादर शिवाय आलेला हा अभिनेता त्याच्या उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांमुळे ओळखला जायचा. मोजकंच पण उत्तम काम करणारा हा अभिनेता फार लवकर सगळ्यांना सोडून गेला. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरवात केलेल्या सुशांतने थोड्याच काळातच आपल्या टॅलेंटची चमक अख्ख्या बॉलीवूडला दाखवूं दिली. मात्र बॉलिवूडच्या काही बड्या नावांना त्याच्यासारख्या टॅलेंट असणाऱ्या कलाकाराचं अस्तित्व कधी जाणवलंच नाही असं अनेकांचं मत आहे. बॉलिवूडमध्ये कोणताही स्ट्रगल न करता आलेल्या अनेकांनी त्याला अक्षरशः झिडकारल्याचे अनेक विडिओ सुद्धा प्रसिद्ध आहेत. अनेक फेमस गॉसिप शो मध्ये त्याच्या नावाला किंमत न देण्याचे, त्याला ओळखच न देण्याचे किस्से सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहेत.

असं असतानाही चाहत्यांनी सुशांतला कधीच नाकारलं नाही. त्याच्या प्रत्येक आणि विविधांगी भूमिकांचा कायमच कौतुक झालं. प्रत्येक भूमिकेचा खोलवर अभ्यास करणारा तो एक नट होता असं आजही म्हणलं जातं. म्हणूनच आज दोन वर्ष होऊन गेली तरी सुशांतच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याला परत ये अशी साद घालणारे असंख्य चाहते पाहायला मिळतात. त्याच्या जाण्याने अनेक वादांना तोंड फुटलं असलं तरी त्याचं जाणं मात्र बोचणारी सल देऊन गेलं हे मात्र खरं.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed