Home » मनोरंजन » अमृता कित्येकांना नाचवते तालावर… 'या' प्रसिद्ध गायिकेलाही सोडलं नाही, पाहा video

अमृता कित्येकांना नाचवते तालावर… 'या' प्रसिद्ध गायिकेलाही सोडलं नाही, पाहा video

अमृता-कित्येकांना-नाचवते-तालावर…-'या'-प्रसिद्ध-गायिकेलाही-सोडलं-नाही,-पाहा-video

मुंबई 12 जून: अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या फुल form मध्ये आहे. चंद्रमुखी (Chandramukhi marathi movie)  चित्रपटामुळे तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. अमृता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कसून तयारी करत होती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती एवढं उत्तम नृत्य करू शकते याची पुन्हा प्रचिती आली. दर आठवड्याला नवनवीन डान्स video टाकून अमृताने कहर केला आहे. आता तर तिने मराठीतील एका प्रसिद्ध गायिकेला सुद्धा नाचायला भाग पाडलं आहे.  चंद्रमुखी चित्रपटाचं तुफान प्रमोशन केलं जात होतं. मराठीतील असे खूप कमी चित्रपट असतात ज्यांचं प्रमोशन उत्तम पद्धतीने केलं जाट त्यातलाच हा एक चित्रपट म्हणता येईल. प्रमोशनसाठी अगदी दादरपासून दुबईपर्यँत एकही ठिकाण या चित्रपटातील कलाकारांनी सोडलं नाही.चंद्राच्या गाण्याने तर अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं. मराठीच नव्हे तर अगदी हिंदीतील कलाकरांना सुद्धा भुरळ पडावी असं हे गाणं आणि त्यावर बनवलेले हजारो रील्स यांनी संपूर्ण भारतालाच वेड लावलं होतं. अगदी नॉन डान्सर कलाकारांनी सुद्धा आपल्या नृत्याचं कौशल्य दाखवून विडिओ तयार केले होते.  अमृताने सुद्धा बरीच मेहनत घेऊन प्रमोशनमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या कलाकारांसोबत अमृताने विडिओ आणि अफलातून रील्स तयार केले होते. एअरपोर्ट पासून अगदी मेट्रोपर्यंत सगळीकडे अमृताने चंद्रमुखीच्या गाण्यावर नृत्य केलं. एवढंच नाही तर अनेक कलाकारांसोबत सुद्धा तिने अनेक डान्स व्हिडिओ केले जे तुफान viral झाले.  यात आता प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वेचं (Priyanka Barve) सुद्धा नाव जोडलं पाहिजे. अमृता आणि प्रियांका यांनी सवाल-जवाब गाण्यातील छोटासा भाग रिलच्या माध्यमातून शेअर केला आहे.प्रियांकाने या गाण्याला आवाज दिला असून प्रत्यक्षात ती एक सुंदर गायिका आहे. पण या व्हिडिओमध्ये तिला सुद्धा अमृताने नृत्य करायला भाग पाडलं आहे, किंबहुना चंद्राचा fever इतका गहिरा आहे की प्रियांकाला सुद्धा स्वतःचा मोह आवरता आला नाही.  या विडिओ ला कॅप्शन देत अमृताने स्पष्ट केलं की सवाल-जवाब हा लावणीतील नृत्यप्रकार जवळपास तीस वर्षांनी प्रेक्षकांसमोर येत आहे.

अमृता असं म्हणाली,”#amritkala “सवाल जवाब” हा प्रकार चंद्रमुखी च्या माध्यमातून तब्बल तीस वर्षांनी लोकांच्या भेटीला आला आणि ज्या गायिकेने अवघ्या महाराष्ट्राचं मन तिच्या जवाबाने आणि आवाजाने जिंकलं तिच्या सोबतचा हा नजराणा …. खास तुमच्या साठी  हे ही वाचा- अशा जाहिराती कराल तर होईल तुरुंगवास, सेलेब्रेटींना हाय अलर्ट चंद्रमुखी या तमाशा प्रधान चित्रपटात अमृताने एका लावणीसाम्राज्ञीची भूमिका साकारली आहे. लोककलाकारांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आणि त्यात चंद्र आणि दौलतराव यांची आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला हा चित्रपट सातव्या आठवड्यात सुद्धा चित्रपटगृहात तुफान कामगिरी करत आहे.   

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.