Home » मनोरंजन » 'प्रेक्षक बोंब मारायला लागले' भरत जाधवला मध्येच थांबवावा लागला नाटकाचा प्रयोग

'प्रेक्षक बोंब मारायला लागले' भरत जाधवला मध्येच थांबवावा लागला नाटकाचा प्रयोग

'प्रेक्षक-बोंब-मारायला-लागले'-भरत-जाधवला-मध्येच-थांबवावा-लागला-नाटकाचा-प्रयोग

मराठी कलाकार चित्रपटांसोबतच आजही नाट्यगृहांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी याच रंगमंचावरून विशेष ओळख मिळवली आहे. यातीलच एक अभिनेता म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav) होय. भरत जाधव आजही नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून भरत रंगमंचावर ‘सही रे सही’ (Sahi Re Sahi) या नाटकाचे प्रयोग करत आहे.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 11 जून-   मराठी कलाकार चित्रपटांसोबतच आजही नाट्यगृहांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी याच रंगमंचावरून विशेष ओळख मिळवली आहे. यातीलच एक अभिनेता म्हणजे भरत जाधव   (Bharat Jadhav)  होय. भरत जाधव आजही नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून भरत रंगमंचावर ‘सही रे सही’   (Sahi Re Sahi)  या नाटकाचे प्रयोग करत आहे. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने आणि उत्सुकतेने या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावत असतात. मात्र नुकतंच नाट्यगृहामध्ये प्रयोग सुरु असताना असा काही प्रकार घडला, ज्यामुळे प्रेक्षकांसह अभिनेत्यानेही खंत व्यक्त केली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपल्या नाटकांच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र आज त्यांची पोस्ट काहीशी वेगळी आहे. या पोस्टमधून एक मोठा मुद्दा नव्याने समोर आला आहे. भरत जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या चाहत्यांच्या काही ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. सोबतच खंत व्यक्त करत म्हटलंय, ‘नाट्यगृह व्यवस्थपन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो”. पाहूया नेमकं काय घडलंय. चाहत्याचा ट्विट- भरत जाधव यांच्या एका चाहत्याने टीव्हीत करत लिहिलंय, ”स्वानुभव भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक डिड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली’. असं म्हणत या चाहत्याने नाट्यगृहाची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आणली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटवली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा ते त्यांच्या कामासंदर्भात पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात.भरत जाधव यांनी आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

  Published by:Aiman Desai

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  Leave a Reply

  Your email address will not be published.