Home » मनोरंजन » सई-ललितनं शेफच्या भूमिकेसाठी हॉटेलमध्ये घालवला होता एक महिना

सई-ललितनं शेफच्या भूमिकेसाठी हॉटेलमध्ये घालवला होता एक महिना

सई-ललितनं-शेफच्या-भूमिकेसाठी-हॉटेलमध्ये-घालवला-होता-एक-महिना

मुंबई 10 जून: सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)  ही जोडी सध्या बरीच चर्चेत आहे. सई आणि ललित अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्रित काम करत आहेत आणि त्यांच्या या जोडीचं खूप कौतुक होत आहे. सई आणि ललित येत्या काळात मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मिडीयम स्पायसी’ (Medium Spicy) चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. यात ते शेफची भूमिका साकारणार आहेत. सई आणि ललित यांनी शेफच्या भूमिकेत जाण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. या चित्रपटात एक वेगळीच लव्हस्टोरी पाहायला मिळणार अशी चिन्ह दिसत आहेत. हॉटेलमधल्या स्टाफच्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित (Parna Pethe) पर्ण पेठे, सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांचा लव्ह ट्रायंगल यात बघायला मिळेल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाचं तुफान प्रमोशन सध्या सुरु आहे. अनेक मुलाखतीच्या माध्यमातून सई आणि ललित यांच्या भूमिकेबद्दल बरीच विचारणा होत आहे. सई आणि ललित याना या चित्रपटात प्रोफेशनल शेफ म्हणून वावरणं गरजेचं असल्याने त्यांनी याच रीतसर ट्रेनिंग घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  राजश्री मराठीच्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकांबद्दल विस्ताराने माहिती दिली. यातललित असं सांगतो, “आम्ही जवळपास एक महिना बॅरोमीटर या रेस्टॉरंटमध्ये आणि बाओबाब नावाच्या रेस्टॉरंट मध्ये रीतसर ट्रेनिंग घेतलं आहे. मी आणि सई आम्ही इतर शेफ्स सोबत रोज शिक्षण घेत होतो. त्यांचं काम कस आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या रुटींप्रमाणे, त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे आमचा दिवस असायचा. एक अख्खा महिना जवळजवळ आम्ही हॉटेलमध्ये प्रशिक्षणात घालवला आहे. त्यांच्यासारखे स्किल जमावे म्हणून आम्ही कष्ट घेतले आहेत.” 

सई असं सांगते,” फक्त अभिनेते आहोत म्हणून आम्हाला कोणतीही सूट नव्हती. आम्ही आमच्यातला अभिनेता सोडून नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देऊन काम करत होतो. अभिनय जसं पॅशनने ओतप्रोत फिल्ड आहे तसंच शेफच फिल्ड सुद्धा आहे. जस अभिनेत्यांना काळाचं वेळेचं बंधन किंवा ठराविक सुट्ट्या नाहीत तसंच शेफ सुद्धा इतरांना सुट्टी असलेल्या दिवशी जास्त काम करतात. यानिमित्ताने मला जाणवलं की शेफच काम खूप अवघड आहे.” हे ही वाचा- छोट्या पडद्यावर एकेकाळी होता स्वयंवरचा ट्रेंड, मिकाआधी कोणी रचले होते ग्रँड स्वयंवर दोघेही सई आणि ललित यांचा हा पहिला प्रोजेक्ट सोबत होता. त्यांचे इतर प्रोजेक्ट जरी रिलीज झाले असले तरी त्यांनी सोबत केलेलं हे पहिलं काम होतं जे आत्ता लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या निमीत्ताने पहिल्या दिवसापासून त्यांनी एकमेकांना शेफ अशी हाक मारायला सुरवात केली जी सवय अजूनही टिकून आहे असं ते सांगतात. 

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.