Home » मनोरंजन » पेहचान कोन! कोणी केली सिम्मीची अशी अवस्था?

पेहचान कोन! कोणी केली सिम्मीची अशी अवस्था?

पेहचान-कोन!-कोणी-केली-सिम्मीची-अशी-अवस्था?

मुंबई, 10 जून: माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत नेहा यशची (Neha Yash Wedding)  लगीन घाई सुरू आहे. रविवारी दोन तासांच्या विशेष भागात नेहा यश अखेर लग्नबंधनात अडकणार आहे. उद्या नेहा आणि यश यांचा हळदी समारंभ ( Neha Yash Haldi) पार पडणार आहे. हळदीत नेहा आणि यश दोघांच्या कुटुंबातील मंडळी धम्माल उडवणार आहे. नेहा यशच्या हळदीत सिम्मी आन्टीची मात्र चांगलीच फजिती होणार आहे. मेकअप करुन मुरडणाऱ्या सिम्मीची सगळे मिळून चांगलीच खोड मोडणार आहेत. मालिकेतील हळदी समारंभाचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात सिम्मीचा लुक पाहून सर्वांना हसू येत आहे. शनिवारी 11 जूनला नेहा आणि यश यांना हळद लागणार आहे. यशची उष्टी हळद घेऊन नेहाच्या घरी आलेल्या सिम्मीची चांगलीच फजित होणार आहे. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये चकाचक मेकअप करुन हळदीच्या लुकमध्ये मोठ्या ऐटीत सिम्मी खोलीतून बाहेर येते. आपल्याला कोणीच हळद लावणार अशा तोऱ्यात सिम्मी मिरवत असते. बाहेर येताच सिम्मीला हळदीला जमलेली गँग बाजूला घेऊन तिच्या तोंडाला हळद फासते. हळद लावायच्या आधीची सिम्मी आणि  हळद लावल्यानंतरची सिम्मी पाहून सगळ्यांची झोप उडाली आहे. प्रत्येकाच्या हळदीला हेच घडतं पण सिम्मीबरोबर जे झालं ते पाहून हसू आवरता आलेलं नाही.

सिम्मीची फजिती पाहून व्हिडीओचा कमेंट सेक्शनवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युझरनं भन्नाट कमेंट करत म्हटलंय, ‘अरे सिम्मीची तर भुतनी बनवली’. तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय, ‘लग्नातही सिम्मीचा असाच मेकअप ठेवा’. तर अनेकांनी सिम्मीच्या भूमिकेचं तोंडभरुन कौतुकही केलं आहे. हेही वाचा – परीनं घेतला पहिल्या पावसाचा आनंद; रेन डान्सचा झक्कास VIDEO व्हायरल नेटकऱ्यांनी तर सिम्मीच्या हळदीतील फजितीवर मिम्सही तयार केलेत. पाहा सिम्मीचा हा भन्नाट मिम.

यश आणि नेहाच्या लग्नातील हे खास व्हिडीओ त्यांच लग्न आणखी खास करणार आहेत. दोघांचा शाही विवाहसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकही जरा जास्तच उत्साही असल्याचं दिसत आहे. लग्नात प्रेक्षकांना एकाहून एक सुंदर सरप्राइज मिळणार आहेत. छोटी परी आईसाठी खास गाणं गाणार आहे. तर नेहा यशची लग्नातली एंट्रीही काहीशी खास असणार आहे. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठचा रविवारचा विवाह सोहळ्याचा दोन तासांचा विशेष भाग पाहायला विसरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.