Home » मनोरंजन » 4G च्या जमान्यात foodie अन्विताला 'या' 3G गोष्टींचं वेड

4G च्या जमान्यात foodie अन्विताला 'या' 3G गोष्टींचं वेड

4g-च्या-जमान्यात-foodie-अन्विताला-'या'-3g-गोष्टींचं-वेड

मुंबई 10 जून: प्रेक्षकांची लाडकी स्वीटू अर्थात स्वीट अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) हे नाव काही सगळ्यांसाठी नवं नाही. एखाद्या गोड पदार्थापेक्षाही स्वीट असणाऱ्या स्वीटूला खऱ्या आयुष्यात सुद्धा खादाडी करायला प्रचंड आवडते. अन्विता खूप मोठी फूडी आहे. पण प्रेक्षकांच्या लाडक्या फूडी अन्विताला 4G च्या 3G गोष्टींनी वेड लावलं आहे. काय आहे हे 3G प्रकरण? अन्विता ठाण्याला राहते. तिला लहानपानापासून खाद्यभ्रमंती करायला आवडत असल्याने (Anvita Phaltankar foodie) तिला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. अन्विताने नुकत्याच एका मुलाखतीत वडापाव खायचा बेत आखात गरमगरम वडापाववर ताव मारला. ठाण्यातील प्रसिद्ध गजानन वडापाव इथून आणलेला चविष्ट वडापाव खात तिने या जागेशी जोडलेल्या लहानपणीच्या आठवणींना सुद्धा उजळा दिला.  राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्ट केलं. ती असं सांगते,”मला वडापावबद्दल विशेष प्रेम आहे. गजानन वडापाव आणि गारवा अशी दोन ठिकाणं माझ्या शाळेपासून खूप जवळ होती. गजानन जागेचा वडापाव आणि गारवा या जागेचा सोडा मला प्रचंड आवडतो. माझ्या शाळेपासून च्या आठवणी या जागेशी जोडल्या आहेत. कधीही शाळेतून कामासाठी बाहेर निघाले की गजानन आणि गारवा या ठिकाणी मी हमखास थांबायचेच. ही माझी आवडीची पेटंट ठिकाणं आहेत. पुढे पुढे तर मैत्रिणींसोबत गजानन, गारवा आणि गॉसिप या 3G चा समीकरण जुळून यायला लागलं.” अन्विता असंही सांगते, “माझ्या आवडीच्या गोष्टी खायला, करायला मी वेळ काढते. आता कोणीतरी बघेल म्हणून माझं जेवणावर असलेलं प्रेम मी कमी तर करू शकत नाही. पण मला डाएट करावं लागलं तरच मी वडापाव नाही खाणार. पण चिट डे ला आवर्जून खाईन.”

अन्विताचं वडापाव प्रेम या मुलाखतीत पाहायला मिळतं. अन्विता जितकी गोड अभिनय करते तितकीच ती खरी आणि गोड खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे. हे ही वाचा- Medium Spicy: सई-ललितनं शेफच्या भूमिकेसाठी हॉटेलमध्ये घालवला होता एक महिना

 तिने ‘bakasour’ नावाने foodies साठी स्पेशल इंस्टाग्राम पेजसुद्धा सुरु केलं होतं. अन्विता ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ (Yeu Kashi Kashi Mi nandayala) मालिकेनंतर अजून तरी नव्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाहीये. तिचा नवा प्रोजेक्ट ती कधी घेऊन येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.