स्वतःसाठी बायको शोधायला मिका रचणार स्वयंवर

मुंबई 10 जून: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh)सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत ही गोष्ट काही नवी नाही पण यावेळी कोणत्या गाण्यासाठी नव्हे तर चक्क लग्नाच्या बातमीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. मिकाला सध्या लगांचे वेध लागले असून स्वतःसाठी योग्य वधू शोधायला त्याने स्वयंवर रचायचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वयंवर ही कल्पना काही नवी नाही. याआधी अनेक बड्या कलाकारांनी स्वतःसाठी स्वयंवर रचण्याचा कार्यक्रम करून झाला आहे. आता यामध्ये मिकाचं सुद्धा नाव जोडलं जाणार आहे. मिका सिंग आपल्या ग्रँड स्वयंवराची सुरवात करत असून ‘मिका दी वोटी’ (Swayanvar- Mika Di Voti) असं या कार्यक्रमाचं नाव आहे. यामध्ये बारा मुलींचा सहभाग असणार आहे आणि त्यातून मिका आपल्यासाठी योग्य मुलीची निवड करून तिच्या गळ्यात वरमाला घालणार असल्याचं समोर येत आहे. 19 जून पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून स्टार भरात आणि डिजनी प्लस हॉटस्टार वर हा कार्यक्रम बघता येणार आहे. आजपर्यंत मिकाची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत. बॉलिवूडच्या अनेक हिट गायनावर मिकाने आपलं नाव कोरलं आहे. अशातच मिकाने अचानक संसार थाटायचा निर्णय कसा घेतला असा प्रश्न सुद्धा विचारलं जात आहे तर एकीकडे त्याच्या या स्वयंवरासाठी अनेकजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे अनेक अपडेट्स मिका स्वतःहून सोशल मीडियावर शेअर करत आहे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण जयपूर इथे होणार असून याचा एक धमाकेदार ट्रेलर नुकताच काही काळापूर्वी समोर आला आहे. यात कपिल शर्मा पासून शान, दलेर मेहेंदी यांच्या पर्यंत अनेक मोठमोठ्या स्टार्सनी मिकाच्या स्वयंवराच्या ग्रँड ओपनिंगला हजेरी लावल्याचं समोर येत आहे. यात दलेर मेहेंदी यांनी मिकाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्याइतका चांगला जोरू चा गुलाम सापडणार नाही असंही ते म्हणले आहेत. कपिल शर्माने सुद्धा मिकाचा संसार लवकर सुरु व्हावा असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
याआधी पब्लिसिटीसाठी अनेकांनी या फंदात पडायचा प्रयत्न करून पाहिला आहे. तसाच हा प्रयत्न असणार का मिका खरंच लग्नाला घेऊन गांभीर्याने विचार करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे ही वाचा- ‘ज्याच्यासमोर आणि बरोबर वाट्टेल तसं व्यक्त होता येतं’, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा VIDEO चर्चेत मिकाशी लग्न करण्यासाठी बारा मुली एकमेकांसमोर येणार असून यातील जी मुलगी त्याला पसंत पडेल तिच्याशी शो च्या शेवटी मिका साखरपुडा करेल असं सांगितलं जात आहे. शो च्या ट्रेलरमध्ये यातील चार मुली रिव्हिल झाल्या आहेत.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.