Home » मनोरंजन » भूकंप नंतर वादळ आणि नंतर कोरोना कहर; 700 भागांत रणजित-संजूला पडद्यामागेही झेलावी लागली होती संकंटं

भूकंप नंतर वादळ आणि नंतर कोरोना कहर; 700 भागांत रणजित-संजूला पडद्यामागेही झेलावी लागली होती संकंटं

भूकंप-नंतर-वादळ-आणि-नंतर-कोरोना-कहर;-700-भागांत-रणजित-संजूला-पडद्यामागेही-झेलावी-लागली-होती-संकंटं

मुंबई 10 जून: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेचा प्रवास आत्तापर्यंत खूपच खास राहिला आहे. या मालिकेचे चाहते महाराष्ट्रभर पसरले आहेत. या मालिकेतील रणजित संजू या जोडीने आपल्या डॅशिंग अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या मालिकेचे आज 700 भाग पूर्ण झाले आहेत. या सातशे भागांच्या प्रवासात कलाकारांना आणि सम्पूर्ण टीमला अनेक संकटांचा सामना करावा लागला.  या मालिकेचा वेगळा विषय, अनोखी प्रेमकहाणी, थेट पोलिसांची डॅशिंग गोष्ट आणि कथानक यामुळे या मालिकेला एवढं यश मिळालं आहे. यामालिकेतील प्रमुख कलाकार शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि मणिराज पवार (Maniraj Pawar) यांच्या जोडीचं विशेष कौतुक होत आहे. शिवनी साकारत असलेली  भन्नाट खट्याळ संजीवनी तर मणिराज साकारत असलेला आयपीएस सगळयांना फार आवडतो. या मालिकेला सुद्धा कोरोनाच्या काळात बऱ्याच नव्या समस्यांचा सामना करावा लागला होता. या जोडीने नुकत्याच न्यूज १८ लोकमतशी संवाद साधत एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. यात शिवानीने  मालिकेच्या एवढ्या मोठ्या टप्प्यावर येत असताना मागे वळून पाहत काही आठवणींना उजाळा दिला होता. शिवानी आणि मणिराज दोघांनीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राबाहेर जात मालिकेचं चित्रीकरण केलं होतं. शिवानी असं सांगते, “ कोव्हिडच्या पहिल्या लाटेत सगळ्यांनाच समजत नव्हतं नक्की परिस्थिती कशी असणार आहे. काम आणि एकूणच आयुष्यात सगळीकडे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती बघता महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करायचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी बायोबबलमध्ये आम्ही असताना अनेक नैसर्गिक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं. तोंतेच्या वादळात सुद्धा आम्ही दोन दिवस अडकलो होतो. त्यावेळी अक्षरशः भूकंप, वादळ अशा सगळ्या संकटांना तोंड देत आम्ही फक्त मालिका नेटाने सुरु राहावी म्हणून चित्रीकरण करत होतो.’  हे ही वाचा– Brahmastra: डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर जखमा, ब्रह्मास्त्रमधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट Look रिलीज कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला असतानाची वेळ पुन्हा कोणालाही आठवावीशी वाटत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्या मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. अवघी मालिका आणि चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. दुसऱ्या लाटेचा कहर तर अधिकच जोरदार होता. महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर जात चित्रीकरण केलं होतं. तेव्हा कथानकात अचानक बरेच बदल सुद्धा झाले होते. असं असूनही राजा-राणीची ग जोडी मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं याबद्दल दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांचे आभार मानले. संजीवनी आणि रणजित ढाले-पाटील या रॉकिंग जोडीने पोलिसांची वर्दी चढवत मालिकेत एक वेगळीच मजा आणली आहे. पोलीस म्हणून त्यांच्या कामगिरीचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. मालिकेत पुढे आय होणार हे पाहणं रंजक असेल. 

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Colors marathi, Marathi actress

Leave a Reply

Your email address will not be published.