Home » मनोरंजन » कार्तिकी विचारणार दीपाला जाब! 'रंग माझा वेगळा' नव्या वळणासह TRPत नंबर वन

कार्तिकी विचारणार दीपाला जाब! 'रंग माझा वेगळा' नव्या वळणासह TRPत नंबर वन

कार्तिकी-विचारणार-दीपाला-जाब!-'रंग-माझा-वेगळा'-नव्या-वळणासह-trpत-नंबर-वन

मुंबई, 02 जून: स्टार प्रवाहवर (Star Pravah) सध्या दोन सुपरहिट मालिकांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळतेय.  ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) आणि ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या दोन्ही मालिकांमध्ये दर आठवड्याला चढाओढ पाहायला मिळतेय. या आठवड्यातही ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका टॉप वनवर आहे. तर ‘आई कुठे काय करते’ दुसऱ्या क्रमांकावर. रंग माझा वेगळा मालिकेत सध्या इमोशन ट्रॅक पाहायला मिळत आहे. दीपा आणि सौंदर्या बोलत असताना कार्तिकी ऐकते. कार्तिकच तिचा बाबा असल्याचं सत्य तिच्यासमोर येत. इतके वर्ष लपवून ठेवलेलं सत्य अखेर कार्तिकी समोर आल्याने मालिकेतील पुढील भाग पाहणे उत्सुकतेचं झालं आहे. मालिकेने घेतलेल्या या नव्या वळणामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून 6.9 टिआरपी रेटींगसह मालिका टॉप वनवर आहे. या जाणून घेऊया काय घडणार रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या भागात. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कार्तिकीला कार्तिकच तिचा बाबा असल्याचं सत्य कळलं आहे. आपल्या आईनं इतके वर्ष हे सत्य आपल्यापासून लपवून ठेवल्यानं कार्तिकीला दीपाचा राग आला आहे. सौंदर्या आणि दीपा देखील या प्रसंगानंतर घाबरुन गेल्यात. मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिकी दीपाला कार्तिक तिचा बाबा असल्याचं सत्य का लपवून ठेवलं याचा जाब विचारते.

प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये कार्तिकी दीपा म्हणते, ‘दीपिकाचा डॅडाच माझे बाबा आहेत’. त्यावर दीपा तिला ‘तुला काय माहिती याबद्दल?’, असं विचारते. त्यावर कार्तिकी तिला ‘मी तुझं आणि आजीचं बोलणं ऐकलं. फ्रेंडचं माझा बाबा आहे.  तुझं आणि फ्रेंडचं लग्न झालं होत, हे सगळं मी ऐकलं’. कार्तिकीचं हे बोलणं ऐकून दीपा हादरुन जाते. तितक्याच कार्तिकी ‘आई मी तुझ्याशी खरं बोलले पण तु माझ्याशी खोट बोललीस’, असं म्हणतं तिला जाब विचारते.  ‘फ्रेंडचं माझे बाबा आहेत’, असं एकदा म्हण असं कार्तिकी दीपाला सांगते. हेही वाचा – ‘भाजी घेताना आईच्या कॉन्फिडन्सला तोड नाही..’ संकर्षण कऱ्हाडे गेला भाजी खरेदीला सध्या रंग माझा वेगळा मालिकेत आलेला हा ट्रॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतो आहे. रंग माझा वेगळा ही मालिका सध्या टीआरपी रेटिंगमध्ये 6.9 वर आहे. तर आई कुठे करते? 6.7 रेटिंग मिळाले आहेत. TRP रेटनुसार मालिका पुढीलप्रमाणे 3- फुलाला सुंगध मातीचा – 6.5 4- सुख म्हणजे नक्की काय असतं! – 5.9 5- तझेच मी गात आहे – 5.2 6- ठिपक्यांची रांगोळी – 4.7 7- माझी तुझी रेशीमगाठ – 4.5 8- स्वाभिमान – 4.1 9- सहकुटुंब सहपरिवार – 3.5 10 मन उडू उडू झालं – 3.1

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “कार्तिकी विचारणार दीपाला जाब! 'रंग माझा वेगळा' नव्या वळणासह TRPत नंबर वन

Leave a Reply

Your email address will not be published.